आंघोळीसाठी गेलेली तीन मुले जळगाव जामोद शहरातुन पळविली...पो.स्टे.ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
मध्यप्रदेश राज्यांमधून जळगाव जामोद तालुक्यामध्ये कुडा-कचरा वेचणारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जळगाव जामोद शहरांमधील गजानन महाराज मंदिराजवळ राहुटी टाकुन राहणाऱ्या कुटुंबातील तीन अल्पवयीन मुले दिनांक 24 मे दुपार पासून बेपत्ता झाली असून यासंबंधीची तक्रार खुशबू लाला पवार वय 35 वर्ष राहणार आठमील तालुका खुडेल जिल्हा इंदोर राज्य महाराष्ट्र यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली आहे.. सविस्तर असे की खुशबु लाला पवार मध्यप्रदेश राज्यांमधून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरिता पती व कुटुंबासह जळगाव जामोद शहरातील गजानन महाराज मंदिराजवळ राहुटी टाकून गावामध्ये कुडा - कचरा जमा करण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत आहे. दिनांक २४ मे रोजी सर्वांनी दुपारी जेवण सोबत केले त्यानंतर एक वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ रचित सुनील गुज्जर व फिर्यादीची दोन मुले देवेन व किशन फिर्यादीला सांगून आंघोळ करण्यासाठी जवळीलच एका पाण्याच्या वॉल्हवर गेले होते. त्यानंतर ते घरी परत आलेच नाही. त्यांचा फिर्यादी व फिर्यादीचे पतीने सगळीकडे शोध घेतला, भुसावल मध्य प्रदेश नांदुरा खामगाव याही ठिकाणी तिघांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. शेवटी हतबल होत ४ थ्या दिवशी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. बेपत्ता झालेल्यांमध्ये फिर्यादीचा भाऊ रचित सुनील गुज्जर वय १५ वर्षे, मुलगा देवेन लाल पवार वय १४ वर्ष, दुसरा मुलगा किशन लाल पवार वय १२ वर्ष बेपत्ता झाल्याची तक्रार जळगाव जामोद पुरुषाला दिल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेंडगे करीत आहेत.हि तीन मुले कोणालाही कुठेही मिळुन आल्यास अथवा दिसल्यास जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सम्पर्क करण्याचे आवाहन ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी केले आहे...
