राष्ट्रमाता जिजाऊ सन्मान पुरस्काराने जिजाताई चांदेकर होणार सन्मानित...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
२० मे रोजी सिंदखेड राजा येथे श्री स्वामी समर्थ,विदर्भ संत्संग सोहळा समीती आयोजीत परमपूज्य गुरुमाऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २० मे २०२५ रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा, जि. बुलढाणा येथे भव्य राष्ट्रीय महासत्संग सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे जिजा ताई चांदेकर राठोड यांना सन्मानित करण्यात येणार आहे उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करतात दिनांक २० मे २०२५ रोजी वेळ दुपारी ३ वाजता मातृतीर्थ सिंदखेड राजा, जि. बुलढाणा येथे कार्यक्रम होणार आहे अशी माहिती आयोजक विदर्भ सत्संग सोहळा, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली