💥महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तनवी ढगे संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात प्रथम...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेणाऱ्या जळगाव जामोद येथील विद्यार्थिनी कुमारी तनवी नितीन ढगे हिला विज्ञान शाखेत बारावीच्या परीक्षेमध्ये जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील प्रथम क्रमांक पटकावला असून ती दोन्हीही तालुक्यामधील मुलींमधून सर्वप्रथम आली आहे तिला विज्ञान शाखेमध्ये ६०० पैकी ५२६ गुण मिळाले असून तिची टक्केवारी ८७.६७% एवढी आहे. तिच्या यशाचे श्रेय ती महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक तसेच तिच्या आई-वडिलांसह संस्थेचे अध्यक्ष संजय उमरकर तसेच सचिव अविनाश उमरकर यांना देते. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय उमरकर, सचिव अविनाश उमरकर व प्राचार्य सुभाष बोंबटकर यांनी तिला उज्वल भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन तिचा सत्कार केला.