प्रा. डॉ. रवींद्र खंडेराव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
श्रीलंका येथील कोलंबो येथे पाचवे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन दि.१७ व १८ मे २०२५ ला संपन्न झाले. या संमेलनात प्रा. डॉ.रवींद्र खंडेराव यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. विद्याधर बनसोड चंद्रपूर, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील नांदेड, उपाध्यक्ष प्रा. डॉ. विलास तायडे अकोट, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. डॉ. अशोक इंगळे अकोला आणि उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिल काळबांडे उमरखेड, विद्रोही कवी तथा साहित्यिक आणि जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक कुमार खोब्रागडे नागपूर, मा.सरांना गुणवर्धना खासदार तथा परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीलंका यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
प्रा. डॉ. रवींद्र खंडेराव हे परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख या पदावर गेली २२ वर्षापासून कार्यरत असून मराठी व मराठी वाङ्मय या विषयाचे अध्यापन करीत आहेत. प्रा.डॉ. रवींद्र खंडेराव यांचा आधुनिक काव्य वांड:मय आणि दलित साहित्य या विषयात विशेष हातखंडा आहे. प्रा. खंडेराव यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रातील स्त्री चित्रण एक चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन आहे. त्यांची आतापर्यंत ३५ राष्ट्रीय शोध निबंध आणि १० आंतरराष्ट्रीय शोध निबंध प्रकाशित असून ते अनेक ठिकाणी विविध विषयावर रिसोर्स पर्सन म्हणून गेले आहेत. त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात जसे की प्राध्यापक, वकील, शिक्षक, प्रशासकीय विभागात अधिकारी तसेच पोलीस विभागात विविध ठिकाणी कार्य करीत आहेत.त्यांचे सामाजिक ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य आहे. या संपूर्ण कार्याची दखल घेत जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन उचित गौरव केला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खांडेकर तसेच महाविद्यालयाची समस्त प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.