घारोड ग्रामस्थांसाठी दु:खद घटना – शोधकार्य सुरू..ठाणेदार कैलास चौधरी सह महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल तर ना. फुंडकरांच्या योग्य कार्यवाहीच्या सुचना...
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
खामगाव विधानसभा मतदारसंघातील मौजे घारोड येथे एक दु:खद घटना घडली आहे. धोंडूजी भगवान इंगळे (वय ७०) हे आपल्या पुतण्यासह शेतावरून परत येत असताना, घारोड ते अकोली दरम्यानच्या नाल्याच्या पुलावरून वाहून गेले. त्यांचा पुतण्या राहुल इंगळे यास पोहता येत असल्यामुळे तो वाचला असला, तरी धोंडूजी इंगळे यांचा अद्याप शोध लागलेला नाही.घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिस स्टेशनचे PI कैलास चौधरी, तलाठी, ग्राम प्रशासन, तसेच SDRF टीमचे श्री. संभाजी पवार आणि खामगावचे तहसीलदार श्री. सुनिल पाटील यांच्या समन्वयाने शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.स्थानिक नागरिकांचा सहभागही या शोधमोहीमेत मोठ्या प्रमाणावर आहे...कोणालाही काही माहिती मिळाल्यास कृपया जवळच्या पोलिस स्टेशनला कळवावे.