वंचित बहुजन आघाडीची जळगाव जामोद तालुका जम्बो कार्यकारणी जाहीर.. तालुका अध्यक्षपदी रमेश नाईक , सचिव पदी साहेबराव भगत...


 
वंचित बहुजन आघाडीची जळगाव जामोद तालुका जम्बो कार्यकारणी जाहीर.. तालुका अध्यक्षपदी रमेश नाईक , सचिव पदी साहेबराव भगत...

अनिल भगत/जळगाव जामोद...

वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारणी मध्ये ४४ पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तालुकाध्यक्ष पदाची धुरा माजी लोकनियुक्त सरपंच रमेश नाईक यांच्यावर सोपविली असून तालुका सचिव पदी साहेबराव भगत, प्रसिद्धी प्रमुख पदी देवाभाऊ दामोदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या जम्बो कार्यकारणीत हरिभाऊ वाघमारे उपाध्यक्ष, दिलीप तायडे उपाध्यक्ष, सुभाष शिरसाट उपाध्यक्ष, मुकेश पवार उपाध्यक्ष, प्रमोद कोकाटे उपाध्यक्ष, गुणवंत मेटांगे उपाध्यक्ष, राजु तायडे उपाध्यक्ष, भागवत वाघ महासचिव, श्रीकृष्ण गवई महासचिव, हसमत खान सचिव, महादेव बोदडे सचिव, परमेश्वर पाखरे संघटक, भिमराव हेलोडे सल्लागार , देविदास निंबाळकर सल्लागार,भास्कर भगत सल्लागार, रवी जाधव सोशल मीडिया प्रमुख, लोकपाल भगत सर्कल प्रमुख,भीमराव वाघ सर्कल प्रमुख, प्रवीण तायडे कार्यालय सचिव, राहुल धंदाळे संघटक, संदीप घटे संघटक, बुद्धभूषण वाघोदे संघटक, मोतीराम हत्रु संघटक, सुरेश वाघोदे प्रसिद्धीप्रमुख,यांच्यासह मनोहर तायडे, सुनील इंगळे, आनंदा गवई ,दामाजी सपकाळ, विनोद गुरुदेव ,रणजीत डोंगरदिवे, विनोद वानखडे, योगेश वाकोडे, अजहर खान, राहुल तायडे ,प्रदीप वानखडे, अमोल पवार, मिलिंद आगरकर, प्रकाश जवंजाळ, मयूर खंडेराव, सह सुनील वारे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने किसन चव्हाण महासचिव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

Previous Post Next Post