शॉर्टसर्किटमुळे मुंडगाव येथे घराला आग..आगीत भाजलेल्या दोघाही बापलेकांचा मृत्यू...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
मुंडगाव येथील बाजार पूरा येथे राहणारे सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घरातील बेडरूम मध्ये त्याचा ९ वर्षीय स्वराज सचिन ठाकरे हा मुलगा झोपलेले अवस्थेत असताना अचानक बेडरूम आग लागली.बेड रूममधून धूर निघत असल्याचे वडील सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या लक्षात येताच आग लागल्याची पेट दिसताच वडिलांनी मुलाला वाचविण्यासाठी धाव घेतली असता वडील सचिन हरिभाऊ ठाकरे वय ४० वर्ष हे सुद्धा आगीत गंभीर रित्या भाजल्या गेले होते.या जखमी दोघांनाही अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मुंडगावात आग वीझावण्यासाठी अग्नीशमन दलाची गाडी सुध्दा दाखल झाली होती.तोपर्यंत गावकऱ्यांनी आग विझविण्यात मदत केली होती.अखेर या आगीत भाजलेल्या दोघाही बापलेकांचा मृत्यू झाला आहे.या आगीत अंदाजे सोने चांदीचे दागिने अंदाजे किंमत ३ लाख ७५ हजार,कपडे व घरेलु साहित्य अंदाजे किंमत ३ लाख,व नगद रोख रक्कम १लाख ८५ हजार रुपये जळून खाक झाली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अकोट ग्रामीणचे एपिआय योगीता ठाकरे,बिट जमादार निलेश खंडारे,पो का जाधव,पो का गलांडे,पो का वैराळे,नायब तहसीलदार सुनील थोटे,मंडळ अधिकारी मनोहर अढाऊ,तलाठी आशेर परमार्थ यांनी भेट देऊन पाहणी केली.पुढील तपास अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात बिट जामदार निलेश खंडारे,पोलीस कर्मचारी करीत आहे.