विद्यार्थी सेनेच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .


 
विद्यार्थी सेनेच्या वतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार .

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला . मातोश्री भवन देशमुख फैल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . शिवसेना नेते माजी विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विलासराव देशमुख यांचे हस्ते हार तुरे व रोख बक्षीस देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले . यावेळी सार्थक गणेश इंगळे (90% )दत्ता राजेंद्र देशमुख (88% ) या गुणवंत विद्यार्थ्यांसह इतरही उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला . तालुका विद्यार्थी सेनेच्या वतीने दरवर्षी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असतो . विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो असे विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले . कार्यक्रमास शिवाजी इंगळे गणेश इंगळे राजेंद्र देशमुख श्रीजीत देशमुख सौ ज्योती देशमुख सौ गीता इंगळे यांचे सह इतरही पालक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .

Previous Post Next Post