अमरावती विभागातून जळगाव जामोद पंचायत समिती अव्वल...


 
अमरावती विभागातून जळगाव जामोद पंचायत समिती अव्वल...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र शासन यांच्या संकल्पनेतुन कार्यालयिन सुधारणा मोहिम १०० दिवसीय ७ कलमी कृती आराखडा कार्यक्रम सम्पूर्ण राज्यात १ जानेवारी पासून सुरू केला, व प्रत्येक कार्यालयास याबाबत निर्देशित करण्यात आले,मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी सम्पूर्ण जिल्ह्यात हे मोहीम यशस्वीरीत्या राबवण्याचे काम सुरू जरून १३ ही पंचायत समिती ने यात कामकाज सुधारणा करण्याचे काम हाती घेतले यातच या उपक्रमातून स्पर्धा सुद्धा लावण्यात आली होती. यात बुलढाणा जिल्ह्यात हा कार्यक्रम यशस्वीरित्या सर्व ७ कलमी कार्यक्रमात अग्रेसर राहण्यात जळगाव जामोद पंचायत समिती ने बहुमान मिळून विभागीय स्तरावर स्पर्धेस पात्र ठरले होते गटविकास अधिकरी संदीपकुमार मोरे व त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी च्या प्रयत्न शंभर टक्के यश संपादन केल्याने विभाग स्तरावर पाचही जिल्ह्यातून ५ पंचायत समिती मध्ये स्पर्धा लागली होती,१ जानेवारीपासून संपूर्ण राज्यामध्ये सर्व कार्यालयांमध्ये कार्यालयीन सुधारणा मोहीम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शंभर दिवसीय सात कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उद्दिष्ट सर्व कार्यालयांना देण्यात आले होते यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालय सर्व सर्व जिल्हा परिषद तसेच, तालुका पातळीवरील कार्यालये इतर सर्व कार्यालय यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांमध्ये प्रत्येक निकषात अमरावती विभागातील ५ जिल्ह्यातील प्रथम ५ पंचायत समिती पैकी जळगाव जामोद पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीपकुमार मोरे व त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या टीमने या चार महिन्यांमध्ये त्यांच्या कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलून नावलौकिक मिळवून ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यासाठी आपली आपुलकीची पंचायत समिती म्हणून सध्या तालुक्यामध्ये नावलौकिक मिळवण्यास पात्र ठरली आहे,४ महिन्यात पंचायत समितीचे सम्पूर्ण चित्र पालटले असून ग्रामीन भागातून येणार प्रत्येक ग्रामस्थ हा समाधानी असल्याचे दिसून येते.कार्यालयामध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था,अभ्यागत महिला व पुरुष यांचेसाठी बैठक व्यवस्था,दिव्यांग बांधवांसाठी बैठक व्यवस्था,प्रत्येक विभाग सक्रिय, लाभार्थ्यांना तात्काळ सुविधा म्हणून वाकी टॉकी इंटरकॉम सेवा, तसेच अंतर्गत कार्यालयीन सुधारणा करण्यात आल्या आहेत, प्रत्येक वेळी विविध उपक्रमाने चर्चेत असणारी पंचायत समिती असून तिला जिल्ह्यात बहुमान मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण दिसून येत होतेच व आता विभाग स्तरावरील स्पर्धेत ही पंचायत समिती प्रथम ठरल्याचा बहुमान नुकताच प्राप्त झाला, ह्यासाठी प्रत्यक्ष विभागीय आयुक्त यांनी गटविकास अधिकारी यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन केले.विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त कवडे साहेब, फडके साहेब यांनी भेट देऊन विविध बाबींची पाहणी करून समाधान व्यक्त केले होते, इंटरकाँम सेवेमुळे काम सोपे झाल्याने त्याचे समाधान तपासणी पथकास झाल्याचे दिसून आले.विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल मॅडम यांच्या तपासणी मध्ये चांदुर रेल्वे, मालेगाव, बार्शी टाकली, कलंब , व जळगाव जामोद ह्या होत्या तर यामधुन उत्कृष्ट कामगिरी मध्ये जळगाव जामोद पंचायत समितीला अव्वल ठरवण्यात आले तर चांदुर रेल्वे द्वितीय, व बार्शी टाकळी ही तृतीय ठरली आहे,

______________________

गटविकास अधिकारी संदीप मोरे याना या बाबत विचारणा केली असता सदर अभियान कालावधी मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचे अनमोल मार्गदर्शन मूळे हे होऊ शकले तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन , उपमुख्य कार्यकरी अधिकारी आशिष पवार, संजय इंगळे यांनी वेळोवेळी आवश्यक त्या ठिकाणी चुका दुरुस्त करून घेतल्याने, व आमचे सर्व अधिकारी कर्मचारी, ग्रा.प अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, केंद्र चालक, मनरेगा टीम, सरपंच बांधव यांच्या सहकार्याने मिशन झेड', दप्तर अद्ययावतीकरण, सेवापुस्तिका अद्ययावतीकरण, रंगरंगोटी, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, तक्रारींचे निराकरण, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पदोन्नती, प्रशासकीय कामकाजात एआयचा वापर, वसुलीची उद्दिष्टपूर्ती, नागरिकांसाठी सोयी, सुविधा यासह विविध उपक्रम राबविण्यात आल्याने या पंचायत समितीने जिल्हा परिषदेसह बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात बहुमानाचा तुरा रोवला असल्याचे बीडीओ संदीपकुमार मोरे यांनी सांगितले,

___ ठळक वैशिष्ट___

1) गटविकास अधिकारी संदिप कुमार मोरे याना कर्मचाऱ्यांनी खांद्यावर उचलून घेऊन उत्साह साजरा केला...

2) ग्रामीण भागातून अनेक लोकांनी ,सरपंच यांनी सत्कार केला

3) परिसरात बिडिओ चे स्वागत फटाके फोडून आनंद व्यक्त केला

यावेळी सर्व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते,पंचायत समिती चा चेहरा मोहरा ५ महिन्यात बदलण्यात यश प्राप्त झाले...

_____________________

जळगाव जामोद पंचायत समिती ला ज्या ज्या वेळी भेटी दिल्या त्या त्या वेळी कार्यालयाची स्थिती चांगलीच दिसून आली तक्रारी ह्या नसल्या सारख्याच दिसून आल्या, विविध नावीन्य पूर्ण कामे येथील बीडीओ व त्यांच्या टीम ने केले त्यामुळं त्यांना यश प्राप्त झाले आहे..

गुलाबराव खरात

मुख्य कार्यकारी अधिकारी

जी प बुलढाणा

Previous Post Next Post