अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा व नियोजन बैठक संपन्न...


 
अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा व नियोजन बैठक संपन्न...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शासकीय विश्रामगृह सभागृह येथे पक्षाची आढावा व नियोजन बैठक घेण्यात आली या नियोजन बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार अमोल मिटकरी प्रमुख उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरू जमा होते. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पक्षाकडून आलेल्या कार्यक्रमा अनुसार जिल्ह्यामध्ये कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन किशोर तेलगोटे यांनी केले .यावेळी काशीरामजी साबळे माजी जिल्हा परिषद सदस्य, डॉ. विशाल इंगोले, अजाबराव उईके, छायाताई कात्रे प्रदेश संघटक, प्रतिभाताई अवचार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी मा.अमोल दादा मिटकरी त्यांचे मोहम्मद बदरू जमा यांनी महाराष्ट्र शासनाच्या सुधारित युवा धोरण  समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले व आ.अमोल दादा मिटकरी यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मध्ये पक्षाने मोठ्या ताकदीने समोर जाण्याचे ध्येय साध्य करणार असल्याचे सांगितले व राष्ट्रवादी पक्ष हा सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष असून यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीवादी ला थारा राहणार नाही व राज माता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या हर्षोल्लासात ही जयंती उत्सव साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी मोहम्मद बदरुज्जमा यांनी जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन अधिक ताकदीने उभे करण्याचे व आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करण्याचा संकल्प व्यक्त केला. राज्यशासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ व महामंडळांचा लाभ जिल्ह्यातील गोरगरीब गरजू बेरोजगार शेतकरी आदिवासी महिला यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करावे व त्यासाठी कुठे मदत लागल्यास आम्हाला कळवावे असे आपल्या भाषणात व्यक्त केले .यावेळी कार्यक्रमाला काशीरामजी साबळे, प्रतिभाताई अवचार ,रूपालीताई वाकोडे, आदिल अन्सारी ,मोहम्मद उमेर, प्रकाश खाडे, रिजवान बाबा, कैलास थोटे ,विनोद कोगदे, राहुल इंगोले,विश्व कला आठवले, संजय आठवले ,विकास पवार, संतोष राठोड, गणेश कवळे, दत्ता कवळे, मंगेश आवडते, संदीप खारोडे, सुरज साळुंखे ,शितल भुस्कडे ,वंदना गिरी, रूपाली धानोरकर, इंजिनिअर रवी पवार, नंदकिशोर शेगोकार, अशोक अवघड इर्शाद खान, श्रीकांत शिरसाट, अब्दुल शहीद, संतोष राठोड,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध विभागातील पदाधिकारी व पक्षामध्ये नवीन प्रवेश घेतलेले  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद कोगदे यांनी केले.

Previous Post Next Post