💥जळगांव जामोद पोलिसांनी चौदाशे ग्रँम गांजा केला हस्तगत..!एका आरोपीसह ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २८ मे रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने एक ४० वर्षिय इसम गांजाची वाहतूक कुऱ्हा-खांडवी मार्गाने करीत आहे. अशा खात्रीलायक माहितीवरून ठाणेदार श्रीकांत निचळ व त्यांच्या टीमने कुऱ्हा - खांडवी रस्त्यावरील सुपो पळशी फाटा येथे नाकाबंदी केली दरम्यान एक मोटर सायकल स्वार वेगाने खांडवीच्या दिशेने आला असता त्यास थांबवून विचारपूस केली असता त्याने उडवा- उडवीची उत्तरे दिली.यावेळी ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी खाकीचा धसका दाखवताच आरोपी विनोद किसन चोपडे वय ४० वर्षे राहणार संग्रामपूर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील असल्याचे सांगितले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून चौदाशे ग्रॅम गांजा मिळून आला. यावेळी पोलिसांनी त्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणले. त्याच्या ताब्यातून चौदाशे ग्राम गांजा किंमत अंदाजे २८ हजार रुपये,१० हजार किमतीचा रियल मी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोन, मोटरसायकल क्रमांक एम एच क्रमांक ३० झेड ३०४२ किंमत अंदाजे ३० हजार रुपये असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून आरोपी विनोद चोपडे यास ताब्यात घेतले आहे त्याच्या विरोधात अप नं २७२/२०२५ कलम ८(क)२२(ब) एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पीएसआय अमोल पंडित,पो.हे.काँ.निलेश पुंडे,पो.काँ.सचिन राजपुत, परमेश्वर ढोण, प्रफुल्ल डब्बे यांनी केली असून पुढील तपास जळगाव पोलीस करीत आहे.