महाराष्ट्र राज्य व मध्य प्रदेश या दोन राज्यात तापीखोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी १९,२४४ कोटींचा भोपाळ येथे सामंजस्य करार - आ.डॉ.संजय कुटे...


 
महाराष्ट्र राज्य व मध्य प्रदेश या दोन राज्यात तापीखोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी १९,२४४ कोटींचा भोपाळ येथे सामंजस्य करार - आ.डॉ.संजय कुटे...

जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये शनिवारी तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासंदर्भात १९ हजार २४४ कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्टयात ५ लाख ७८ हजार एकराला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळाची बैठक काल भोपाळ येथे पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव, तसेच दोन्ही राज्यांचे जलसंपदा उपस्थित होते.या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील खारपाणपट्ट्यामुळे पेयजल आणि सिंचनाच्या समस्या असलेल्या भागात मोठा लाभ होणार आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवरील खारीया गुटीघाट येथे ८.३१ टीएमसी क्षमतेचा वळण बांध बांधण्याचा प्रस्ताव आहे. बंधाऱ्यापासून सुमारे २२१ किमी एवढ्या लांबीचा उजवा कालवा व सुमारे २६० किमी एवढ्या लांबीचा डावा कालवा प्रस्तावित आहे. या कालव्यातून स्थानिक नद्या वाहत्या राहण्यासाठी पाणी सोडून पुर्नभरण करणे प्रस्तावित आहे.तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पाचा आ.डॉ.संजय कुटे यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला होता  सदर प्रकल्पाचा सन २०१८ मधे  हेलिकॉप्टर  द्वारे  जळगांव जामोद येथून लिडार  सर्व्हे करण्यात आला होता त्यानंतर २०२३ मधे आदिवासी गांव रायपूर येथुन जाणाऱ्या कालव्याची  अधिकाऱ्यांसोबत पाहणी सुद्धा त्यांनी केली होती. सन २०२० ते  सन २०२५ मध्ये यासंदर्भात मुंबई  व  दिल्ली येथे बैठकाही झाल्या होत्या. या प्रकल्पाबाबत दोन्ही राज्य परस्परांच्या संपर्कात होते. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी आंतरराज्य जल करारांना गती देण्यास सांगितले आणि त्यामुळे राज्यसरकारने या प्रकल्पाला गती दिली होती. 

--प्रकल्पाची वैशिष्ट्ये--

तापी नदीवर मध्य प्रदेशातील खरिया गुटी घाट येथे धरण

एकूण सिंचन लाभ -३,५७,७८८ हेक्टर

महाराष्ट्राला लाभ -२,३४,७०६ हेक्टर (बुलढाणा,जळगाव, अकोला,अमरावती)

मध्य प्रदेशला लाभ - १,२३,०८२ हेक्टर (बुऱ्हानपूर, खांडवा)

एकूण पाणीवापर - ३१.१३ टीएमसी

महाराष्ट्राला १९.३७ टीएमसी तर मध्य प्रदेशला ११.७६ टीएमसी

योजनेचा खर्च - १९ हजार २४४ कोटी

______________________________________

तापी खोरे प्रकल्पाच्या पूर्णत्वा नंतर  जळगांव जामोद मतदासंघातील प्रत्येक नदीमधे पाणी थांबलेल असेल. मागील ३५-४० वर्षात मतदारसंघातील  झपाट्याने खाली गेलेली पाण्याची पातळी वाढन्यास पुर्णपणे मदत होणार असुन आपण लहानपणी पाहलेली बारमाही वाहणारी प्रत्येक नदी पुन्हा पाहण्यासाठी मिळणार आहे याचा अतिशय आनंद आहे.

आ.डॉ.संजय कुटे..

Previous Post Next Post