भेंडवळ येथील गावठी दारू अड्ड्यावर जळगाव जामोद पोलिसांची कारवाई... पोलीस नाईक शेख इरफान यांनी मुद्देमाल घटनास्थळीच केला नष्ट...


भेंडवळ येथील गावठी दारू अड्ड्यावर जळगाव जामोद पोलिसांची कारवाई... पोलीस नाईक शेख इरफान यांनी मुद्देमाल घटनास्थळीच केला नष्ट...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

तालुक्यातील भेंडवळ येथील महिलांनी एकत्र येत गावामध्ये अवैध धंदे तसेच अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला होता व गावातील अवैध धंदे यासह दारू विक्री बंदची तक्रार व निवेदन जळगाव पोलीस स्टेशनला महिलांनी मिळून दिले होते. ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी महिलांच्या निवेदनाची दखल घेउन गावामधील अवैध धंदे बंद केले होते.अशातच पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की भेंडवळ बुद्रुक शेत शिवारातील एका शेतामध्ये गावठी हातभट्टीची दारू विक्रीच्या उद्देशाने तयार करत आहे. अशा माहितीवरून पोलीस नाईक इरफान शेख,पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे व पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांनी घटनास्थळ गाठून रेड केली असता आरोपी रामेश्वर राजाराम जाधव वय ४९ वर्ष यास रंगेहाथ पकडले यावेळी त्याच्या ताब्यातून तीन लोखंडी टिपे ज्यामध्ये ४५ लिटर मोह सडवा किंमत प्रति लिटर पन्नास रुपये प्रमाणे २२५० रुपये, १५ लिटर च्या दोन प्लास्टिक कॅन मध्ये ३० लिटर मोह दारू किंमत शंभर रुपये प्रमाणे ३ हजार रुपये, तसेच पाच लिटरच्या प्लास्टिक कॅन मध्ये ४० लिटर हातभट्टीची दारू किंमत ४ हजार हजार रुपये, तीन लोखंडी टिपे किंमत १५० रूपये, दोन १५ लिटरच्या प्लास्टिक कॅन किंमत शंभर रुपये, आठ पाच लिटरचे प्लास्टिक कॅन किंमत १६० रुपये असा एकूण ९६६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळुन आल्याने पोलीस नाईक शेख इरफान व सहकाऱ्यांनी घटनास्थळीच पंचांसमक्ष मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला व आरोपी रामेश्वर राजाराम जाधव यांचे विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अप क्रमांक २५८/२०२५ कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषारोप पत्र न्यायला दाखल करतेवेळी हजर राहण्याचे अटीवर लेखी सूचना पत्र देऊन आरोपीस सोडून देण्यात आले आहे सदरची कारवाई ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे मार्गदर्शनात पोलीस नाईक शेख इरफान पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे व पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांनी केली..

Previous Post Next Post