आदर्श सरपंच भारती मोरे महिला समाजभूषण पुरस्काराने सन्मानित....
राजेश दामोदर...
खामगांव तालुक्या मधील ग्राम टेंबूर्णा येथे प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने १७ मे रोजी बौद्ध धर्मीय सामूहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्यामध्ये आदर्श सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे टेंभुर्णा यांचे बदलत्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक परिस्थितीतही सामाजिक कार्याचे योगदान पाहून प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्थेने त्यांना महिला समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे . सदर पुरस्कार वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोकभाऊ सोनोने यांच्या शुभहस्ते देण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट साहेब , आ.सिद्धार्थ खरात, प्रबुद्ध संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक आनंद वानखडे सर , भदंत राजज्योती, उपसभापती संघपाल जाधव, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकशे, सौ. अनिता डोंगरे, राजेंद्र सुरवाडे, सुभाष सुरवाडे, राजेश हेलोडे, माजी नगरसेवक विजय वानखडे, शरद वसतकार इत्यादिंची उपस्थिती होती .
