बापूमिया पटेल कनिष्ठ महाविद्यालयाच्या १००% निकालाची परंपरा कायम...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा नुकताच निकाल जाहीर झाला असून पिंपळगाव काळे येथील हज्जन जैतुनबी बापूमिया पटेल कनिष्ठ महाविद्यालयाने सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली असून विज्ञान शाखेतून ६३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.यामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून,विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर प्रथम श्रेणीमध्ये ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक हर्शल विलास खंडारे ह्याने पटकाविला असून त्याला ८६.५०% गुण प्राप्त झाले आहे, तर द्वितीय क्रमांक तुषार केशव मुकुंद ह्याचा असून त्याला ७९.१७% गुण प्राप्त झाले आहेत, तसेच विज्ञान शाखेतून तृतीय क्रमांक राशी जितेश पलन हिने पटकाविला असून तिला ७९% गुण मिळाले आहेत तर कला शाखेतून १५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीमध्ये २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ९४% लागला आहे . कला शाखेतून प्रथम क्रमांक सामिया सदफ मोईन खान या विद्यार्थिनीने ६४% गुण प्राप्त केले आहेत. वाणिज्य शाखेतून ४ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यापैकी २ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल १००% लागला आहे . वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक जुवेरीया बानो मो. शाकीर या विद्यार्थिनीचा असून तिने ७९% गुण प्राप्त केले आहे. एकूण महाविद्यालयाचा निकाल ९८.७८% लागला आहे या सर्व उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष ॲड.सलीम बापूमिया पटेल,उपाध्यक्ष कय्युम पटेल,सहसचिव रब्बानी देशमुख, तसेच संचालक सिराजोद्दीन भाई पटेल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मो. शोएब यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.