राष्ट्रीय बंजारा परिषद च्या बुलढाणा जिल्हाअध्यक्षपदी जिजाताई राठोड (चांदेकर)
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:-
मागील कित्येक वर्षापासून समाजसेवेचे व्रत अंगीकारत समाजसेवा हा एकच ध्यास मनाशी बाळगून महिला, बालक, शेतकरी व शेतमजूर अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर कार्य करीत असणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जिजाताई राठोड चांदेकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना देशातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषद च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संपादक, धर्मनेता, राष्ट्रीय समन्वयक किसन राठोड, प्रदेशाध्यक्ष सीमाताई राठोड, कार्याध्यक्ष निर्मलाताई जाधव व महाराष्ट्र प्रदेश सचिव उमेश राठोड यांच्या नेतृत्वात एकमताने जिजाबाई राठोड चांदेकर यांची राष्ट्रीय बंजारा परिषद च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून समाजाचे हित म्हणजे त्यांचे हक्क अधिकार समाजामध्ये जागरूकता आणण्यासाठी समाज संघटन वाढविण्यासाठी जिजाताई राठोड यांना ही जबाबदारी देण्यात आली.राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या जिजाताईंना समाजाच्या उन्नतीसाठी मिळालेली ही एक संधी आहे.सामाजिक स्तरावर जिजाताईंच्या या निवडीने हर्ष उल्हास निर्माण असुन समाजातून व आप्तेष्टांमधून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.