धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्यावतीने स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास मार्गासाठी ०१ लाख रुपयाचा कर्तव्यनिधी युवानेते मृत्युंजय गायकवाड यांनी केला सुपूर्द...!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
दिनांक २० मे २०२५ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या पावन भूमीमध्ये जागर स्त्रीशक्तीचा गजर राष्ट्रभक्तीचा महासत्संग सोहळा परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता...!यावेळी त्या ठिकाणी महिला सक्षमीकरण मेळावा,सर्व जातीधर्मीय वधुवर नाव परिचय मेळावा, विषमुक्त शेती विषयक मार्गदर्शन तसेच भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या ठिकाणी ३००० विविध पदाच्या नोकऱ्यांसाठी देखील मेळावा आयोजित करण्यात आलेला होता..महासत्संग सोहळ्यास बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी आवर्जून उपस्थित राहून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्यावतीने श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे आशिया खंडातील सर्वात मोठे आध्यात्मिक मोफत-माफक सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल, अन्नछत्र, नर्सिंग कॉलेजेसची पायानिर्मिती सुरू झालेली असून गोरगरिबांना भविष्यामध्ये त्याचा मोफत लाभ मिळावा याकरिता एक लक्ष रुपयाचा कर्तव्यनिधी त्या ठिकाणी सुपूर्द केला...!यावेळी त्या ठिकाणी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी माता-भगिनी तसेच मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....!
