हिवरखेड येथे पंजाब डख यांचे मार्गदर्शन व भव्य शेतकरी मेळावा...


 
हिवरखेड येथे पंजाब डख यांचे मार्गदर्शन व भव्य शेतकरी मेळावा...

प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

शनिवार दि. 31 मे रोजी संध्याकाळी ठीक 6.00 वा. कस्तुरबा गांधी विद्यालय हिवरखेड येथे हिवरखेडचे माजी उपसरपंच श्री रमेश दुतोंडे व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुलभाताई दुतोंडे यांनी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख हे मार्गदर्शन करणार असून त्याचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांच्याव्यतिरिक्त श्री भरत चव्हाण कृषी अधिकारी पंचायत समिती तेल्हारा व श्री गौरव राऊत मंडळ कृषी अधिकारी हिवरखेड हे सुद्धा शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना व विमा योजनाबद्दल माहिती देणार आहेत. आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शेतकरी मेळाव्याचे उदघाटक माजी सरपंच मिलिंदकुमार भोपळे असणार आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री अनिलभाऊ गावंडे, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री सुनिल इंगळे ख. वि. संघ तेल्हाराचे माजी सभापती श्री अनिलभाऊ कराळे, माजी पंचायत समिती सदस्य श्री मनिषदादा भांबुरकर, सेवा सहकारी सोसायटी हिवरखेडचे सभापती श्री ज्ञानदेवराव मोरोकार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात हिवरखेड व परिसरातील भरघोस उत्पन्न घेणाऱ्या काही निवडक शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा होणार आहे तरी या मेळाव्याला शेतकरी बांधवानी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक महेंद्र कराळे, प्रविण येऊल व किरण सेदानी यांनी केले आहे.

Previous Post Next Post