💥व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पिडितेशी केले वारंवार शरीर संबंध प्रस्थापित..आरोपी विरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणी जळगाव जामोद शहरातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून, दिनांक २७ मे रोजी अल्पवयीन तरुणी कॉलेजला जाण्यासाठी जळगाव जामोद बस स्थानकातून कॉलेज कडे निघाली असता तिचा आरोपी गोकुळ तराळे वय २७ वर्ष या तरुणाने वाईट उद्देशाने पाठलाग करून पीडीत अल्पवयीन तरुणीला त्याच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत होता व तो पिडीत तरुणीला मोटरसायकलवर जबरदस्तीने बसवून शहरातीलच एका खोलीवर घेऊन गेला होता तिथे त्यांने पिडीत अल्पवयीन तरुणीवर तिच्या इच्छेविरोधात जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच यापुढे जर मला न विचारता कुठे गेली तर तुला जीवाने मारून टाकीन अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. पीडित तरुणीने तिच्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी गोकुळ तराळे हा दिनांक १५ जुलै २०२४ पासून त्याच्यासोबत चे जबरदस्तीने काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची धक्कादायक माहिती पीडित तरुणीने पोलिसांना दिली. पोलिसांना दिलेल्या माहितीवरून आरोपी गोकुळ तराळे व २७ वर्ष याच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अप नं.२७०/२०२५ कलम ६४(२), (m),७४,७५,७८,३५१(२),३५२ बी.एन.एस. सहकलम ४, ६, ८, १२ बालकांचे लैंगीक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम २०१२, सहकलम ३(१) (W) (i) (ii), ३ (२)(va),३(२)(V) Atrocity Act. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील मलकापुर यांचेकडे देण्यात आला आहे.