जळगांव जामोद वकील संघा मार्फत भारताचे ५२वे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांचा अभिनंदना चा ठराव पारीत...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
दिनांक १४/०५/२०२५ रोजी वकील संघ जळगाव जामोद मार्फत भारतातील सर्वोच्च पदी विदर्भाचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती भवन येथे महानुभाव राष्ट्रपती यांचे हस्ते शपथ ग्रहण करुन आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे विदर्भ व महाराष्ट्राचे नाव न्यायव्यवथेत गौरवशाली इतिहासामधे सुवर्णाक्षरानी नोंदविले त्या प्रित्यर्थ विदर्भाचे सन्माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांचे अभिनंदनाचा प्रस्थाव सर्वानुमते संमत करण्यात आला तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी जळगाव जामोद वकील संघाचे मा. ॲडव्होकेट खेर्डेकर व सर्व सन्माननीय सदस्य हजर होते अभिनंदनाचा ठराव सर्वोच्च न्यायालय दिल्ही येथे पाठवण्यात आला.
