जुन्या वैमनस्यातुन केला जिवघेणा हल्ला..वडगांव गड येथिल घटना...


 
जुन्या वैमनस्यातुन केला जिवघेणा हल्ला..वडगांव गड येथिल घटना...

जळगांव जामोद प्रतिनिधी...

जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम वडगांव गड येथे दिनांक७ मे २०२५ रोजी जुन्या वैमनस्यातुन अतिशय क्रुरपणे ६० वर्षीय  शेख मुसंन्नीफ शेख रशिद यांना शेतात काम करीत असताना अताउल्ला   खान यासिन खान यांनी लाठिने बेदम मारहाण केली या मारहाणीत शेख मुसंन्नीफ यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने हात फ्रेक्चर झाला आहे.आरोपी अताउल्ला खान  यासिन खान यांच्या मुलाने सुद्धा जखमी वडिलांच्या मुलाला जळगांव जामोद येथे आले असता आरोपिचा मुलगा शारिक खान याने धमकी दिल्याने त्याच्यावर सुद्धा ११८( १),११५(२) ३५२,३५१,   (२),३(५) कलमान्वये  गुन्हा नोंदविण्यात आला आहे जखमी शेख मुसंन्नीफ हा अकोला  येथे उपचार घेत आहे व आरोपीअताउल्ला खान व शारीक खान हे फरार आहेत पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल तय्यब अली सय्यद हे करित असुन आरोपीचा शोध घेत आहेत

Previous Post Next Post