खामगांव एमआयडीसीत कामगाराचा शॉक लागून मृत्यू..कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप...


खामगांव एमआयडीसीत कामगाराचा शॉक लागून मृत्यू..कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप...

सुरज देशमुख/बुलढाणा....

बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव येथे असलेल्या एमआयडीसीतील फेज दोनमधील एका लोखंडी सलिया बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या 47 वर्षीय कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि. 22 मे 2025. रोजी सकाळी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे. राजू विश्वनाथ सुलताने (वय 47) असे मृत कामगाराचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी राजू सुलताने हे नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर गेले असता वेळेत कंपनीत काम करत होते. काल रात्री खामगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कंपनीमधील वायरिंग मध्ये पाणी गेल्याने वायरिंग मध्ये करंट आलेला होता. ही गोष्ट कंपनीमध्ये काम करणारा कामगार राजू सुलताने याला माहीत नव्हती. त्या ठिकाणी हा कामगार काम करण्यासाठी गेला असता, त्या ठिकाणी असलेल्या लोखंडी फॅन सुरू करण्यासाठी हा गेला असता राजू सुलताने याला कंपनीत असलेल्या लोखंडी फॅन मध्ये करंट आल्याने त्याला जोरदार धक्का लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विजेचा धक्का लागल्यानंतर जवळपास एक तास त्याचा मृतदेह कंपनीच्या आवारातच पडलेला होता त्याला तात्काळ उपचार दिल्या न दिल्यामुळे तसेच कंपनी मालक, चालक यांच्या निष्काळजीपणामुळे इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोप सुद्धा मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. कंपनीने निष्काळजीपणाचे कृत्य करून, सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेतल्याने राजू सुलताने याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकनी केला आहे. कंपनी मालकावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी कामगाराच्या नातेवाईकांनी केली आहे. सदरच्या जय जगदंबा रील रोलिंग कंपनीमध्ये जवळपास 80 ते 100 कामगार काम करतात, मात्र या सर्व कामगारांचे कुठल्याही प्रकारचे अपघाती विमा व कामगारांना काम करत असताना कुठल्याही प्रकारची सेफ्टी सुद्धा देण्यात येत नाही असे कंपनीत पाहणी दरम्यान दिसून आले. एमआयडीसी मध्ये असलेल्या या कंपनीला सर्व नियम व अटींची पूर्तता न करताच परवानगी कशी मिळते हे सुद्धा न उघडणारे कोड आहे. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री अँड.आकाश फुंडकर यांनी या प्रकरणाकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष घालावे व कंपनीला कामगारांचे कुठलेही विमा संरक्षण व सेफ्टी नसल्याचे पाहणी करून कंपनीवर कार्यवाही करावी अशी मागणी सुद्धा मृतकाच्या नातेवाईकांकडून होत आहे.

Previous Post Next Post