सौ गिता शिवदास सोनोने व रमाबाई महिला बचत गट यांना यावर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान...


 
सौ गिता शिवदास सोनोने व रमाबाई महिला बचत गट यांना यावर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

 सुनगांव ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक ३१ मे रोजी महिला व बाल विकास विभाग  महाराष्ट्र शासन  यांचा ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी समाजसेवा व गृहउद्योग मध्ये अग्रेसर महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले यावेळी सुनगांव येथील सौ गिता शिवदास सोनोने व रमाबाई महिला बचत गट यांना ग्रामपंचायत कार्यालय  सुनगाव येथे सरपंच रामेश्वर अंबडकार  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, धनादेश, शाल व श्रीफळ देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य विमल काळपांडे, योगिता कुरवाडे, संतोष वंडाळे ग्रामपंचायत सदस्य यांचेसह ग्रामपंचायत कर्मचारी व रमाई बचत गटाच्या महिला व पत्रकार गजानन सोनटक्के, पत्रकार शिवदास सोनोने व गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post