शेगाव आगारात नवीन एस.टी. (लालपरी) बसेसचे डाॅ अपर्णाताई कुटे यांचे हस्ते लोकार्पण...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....
शेगाव मतदारसंघातील प्रवाश्यांच्या सोयीसाठी नवीन एस.टी. बसेस आता शेगाव आगारात दाखल झाल्या असून, आज या बससेवेचे लोकार्पण आज सौ.अपर्णा संजय कुटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.संतनगरी शेगाव येथे राज्यभारातून भाविक भक्त येत असल्याने बससेवा मंजूर करण्यासाठी आ डॉ.संजय कुटे यांनी विशेष पाठपुरावा केला. आणि आता बसेसचे लोकार्पण झाल्यामुळे समाधान वाटते. नवीन बसेस दाखल झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास आता अधिक सुरक्षित, सोयीस्कर व वेळेवर होणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तसेच नोकरदार वर्गाला रोजच्या प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यातही आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी अशीच तळमळ आणि सेवा अखंड सुरू राहील.यावेळी संतोष देशमुख विजय भालतडक ज्ञानेश्वर साखरे राजेंद्र ढोले राजेश अग्रवाल अशोक चांडक कल्पनाताई मसने अंजलीताई जोशी चेतनाखेते संगीता आसरे संगीता बेलोकार डॉक्टर अंजुषा पुतळा प्रणिता कलोरे तसेच आगार व्यवस्थापक शुभांगी पवार वाहतूक निरीक्षक महेश पाटील शेगाव आगारातील चालक वाहक प्रवासी नागरिक उपस्थित होते.