शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...


शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा शिवराज्याभिषेक दिन संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे. याच पावन दिनाचे औचित्य साधून हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिनव पद्धतीने अभिवादन करण्याच्या उद्देशाने नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मलकापूर येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धनश्रीताई काटेकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, अजय टप विदर्भ अध्यक्ष, श्रीकृष्ण तायडे जिल्हा अध्यक्ष, रवींद्र गणगे सर जिल्हा सचिव, हे होते सदर कार्यक्रमात शालांत परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमांमध्ये नेहा विजय मेहसरे ,आनंदी विजय जावरे, भारती अनिल वानखेडे ,प्रीती अनिल वानखेडे ,गायत्री धर्मसिंह राजपूत, शबाना निसार शेख ,श्रेया विजय मेहसरे ,आधिराज श्रीकृष्ण तायडे ,रणवीर प्रदीप इंगळे,वेदांत भगवान चोपडे ,तुषार प्रदीप इंगळे,जय विकास गाढे ,मोहम्मद जीशान मोहम्मद शकील ,मोहम्मद जियान मोहम्मद शकील ,मोहम्मद अर्शद मोहम्मद सलीम ,मोहम्मद फैयाज मोहम्मद इसाक,मोहम्मद उमरे मोहम्मद जुबेर ,मोहम्मद शहीद मोहम्मद साबीद इत्यादी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा प्रकाश थाटे , रवी गव्हाळे ,शेख निसार, प्रदीप इंगळे, धर्मेश राजपूत, सुधाकर तायडे, मयूर लड्डा, सय्यद ताहेर, शकील कुरेशी शिक्षक उर्दू गर्ल हायस्कूल यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post