जामोद मार्केट यार्ड मध्ये मातीमोल भावाने भुईमुगाची खरेदी.. कर्मचारी धरतात शेतकऱ्यास वेठीस..शेतकरी गजानन कपले यांचा आरोप...


 
जामोद मार्केट यार्ड मध्ये  मातीमोल भावाने भुईमुगाची खरेदी.. कर्मचारी धरतात शेतकऱ्यास वेठीस..शेतकरी गजानन कपले यांचा आरोप...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुकीच्या निर्णयामुळे भुईमूग पेरणाऱ्या शेतकऱ्यांना जामोद मार्केट यार्ड मध्ये मातीमोल भावाने भुईमुगाची विक्री करावी लागत आहे. बाजार समितीने ग्रामीण पातळीवर असणाऱ्या व्यापाऱ्यांना स्थानिक पातळीवर भुईमुगाची खरेदी करण्यासाठी मज्जाव करून त्यांना त्यासंबंधी सूचना पत्र दिले आहे. स्थानिक गावातील व्यापाऱ्यांना भुईमूग खरेदी करण्यासाठी बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भुईमूग हा मार्केट यार्डतच विकावा लागतो शेतकऱ्यांनी बाजार समितीचा तो निर्णय सुद्धा मान्य केला परंतु मार्केट यार्ड मध्ये जो माल खरेदी केला जातो त्याचे पैसे शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवस मिळत नाहीत वास्तविक बाजार समितीच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात शेतीमालाचे पैसे मिळायला पाहिजे किंवा त्या दिवशीच धनादेश मिळाला पाहिजे पण तसे होत नाही तसेच एखाद्या शेतकऱ्याजवळ जर एक ,दोन  क्विंटलच भुईमूग असेल तर त्याला गाडी भाडे व पूर्ण दिवस मार्केट यार्ड मध्ये घालवावा लागतो असा आरोप सुनगाव येथील ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष गजानन कपले यांनी केला आहे.तसेच भुईमगाचे खरेदीदार हे फक्त जामोद यार्डात चार ते पाच व्यापारी असतात त्यामुळे भुईमुगाचा लिलाव हा योग्य पद्धतीने होत नाही या अगोदर जामोद यार्डात नांदुरा, खामगाव ,अकोट या ठिकाणचे व्यापारी येत होते व शेतकऱ्यांना दोन पैसे शिल्लक मिळत होते. मात्र आता तसे होताना दिसत नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.

Previous Post Next Post