'अस्पायर' चा तीन दिवसीय ' अराइज कॅम्प'...किर्तेश अग्रवालला 'आऊटस्टँडिंग कॅम्पर' पुरस्कार...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
इंग्रजी आणि मानव विकासाचे धडे देणाऱ्या 'अस्पायर, इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट...' या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या अराईज कॅम्प मध्ये किर्तेश नंदकिशोर अग्रवाल हा विद्यार्थी आऊटस्टँडिंग कॅम्पर अवॉर्डचा मानकरी ठरला. किर्तेशसह विविध पुरस्कारांचे मानकरी ठरणाऱ्या सर्वांना या कॅम्पमध्ये सन्मानित करण्यात आले.सचिन बुरघाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अस्पायरच्या वतीने दरवर्षी अशा प्रकारचा कॅम्प घेण्यात येतो. या कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन दिवस मोबाईलपासून दूर ठेवत एका नव्या विश्वाची अनुभूती मिळते. यावर्षी हा कॅम्प डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आला होता. या तीन दिवशीय कॅम्पमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा किर्तेश अग्रवाल हा सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा मानकरी ठरला.अन्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये पॉझिटिव्ह कॅम्पर अवॉर्ड डॉ. श्रुती मुकुंद, डेडिकेटेड कॅम्पर अवॉर्ड देवेश वक्ते, अनस्टॉपेबल कॅम्पर अवॉर्ड वेदांत कोरडे आणि सौ. रुपाली देशमुख, विक्री कर निरीक्षक, जीएसटी विभाग, एक्सलंट एफर्ट अवॉर्ड ओंकार अंबुलकर, इन्फ्लुएंसर अवॉर्ड कबीर जानभोर आणि कु. सान्वी घरलूटे, एस्केप्शनल परफॉर्मर अवॉर्ड ऋतुराज गावंडे यांचा समावेश आहे.तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण सकारात्मक विचार ठेवून, येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासंदर्भात एक विशेष प्रशिक्षण अशा कॅम्पमध्ये देण्यात येते. समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधताना पाळावयाची पथ्ये, त्यासाठी करावे लागणारे खास प्रयत्न आणि एकूणच जीवन जगताना आवश्यक असणाऱ्या बाबी या कॅम्पमध्ये शिकविल्या जातात. आंतरराष्ट्रीय व्याख्याते असलेले सचिन बुरघाटे सर तिन्ही दिवस पूर्ण वेळ या कॅम्पमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी नियमितपणे हा तीन दिवशीय कॅम्प अस्पायरच्या वतीने आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी आयोजित या कॅम्पचा समारोप रविवारी सायंकाळी पार पडला. कॅम्पमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व सहभागी होणाऱ्या सर्वांचाच समारोपीय कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. आऊटस्टँडिंग कॅम्पर अवॉर्ड मिळविणाऱ्या किर्तेशचा सोमवारी आमदार वसंतजी खंडेलवाल यांच्या हस्तेही सत्कार करण्यात आला. पुरस्कार मिळविणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन...