ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, अवैध देशी दारू तस्करास अटक!"अजिंठा रोडवरील देऊळघाट परिसरातील घटना"


 
ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, अवैध देशी दारू तस्करास अटक!"अजिंठा रोडवरील देऊळघाट परिसरातील घटना"

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून सर्रासपणे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक व विक्री सुरू असल्याने या भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला होता.देऊळघाट व परिसरातील अवैध देशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्या वर पोलीस प्रशासनाने कळक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत असल्याने बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गजानन कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे सूचनानुसार सापडा रचून दिनांक १० जून २०२५ रोजी सायं ०६ वाजेच्या सुमारास देऊळघाट ते अजिंठा रोडवर( P S I) गोकुळसिंग राठोड, बीट जमादार श्री तायडे, व श्री सुधीर मगर सह इतर पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने बुलढाणा येथून अवैध देशी दारूचे बॉक्स बजाज पल्सर दुचाकीवर गाडी नं MH 28 BL9991 घेऊन जात असणाऱ्या अशोक सुखदेव पन्हाळे या व्यक्तीस अजिंठा रोड रसवंती जवळ अरुण त्यास ताब्यात घेऊन दुचाकीची तपासणी केली असता त्यावर अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक केल्या जात असल्याचे आढळून आले या प्रकरणी मूळ मालक गजानन दगडोबा पन्हाळे व अशोक सुखदेव पन्हाळे या दोघांवर ग्रामीण ( बुलढाणा) पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांचे कडून एकूण 77020 रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आहे.

Previous Post Next Post