देऊळघाट येथील मुख्य मार्गावर पोलिसांची वाहनावर कारवाई...!


 
देऊळघाट येथील मुख्य मार्गावर पोलिसांची वाहनावर कारवाई...!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

 देउळघाट हे मोठ्या वर्दळीचे ठिकाण असून येथून राज्य महामार्गसह १०ते १५खेडे लागून असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना आरोग्य इतर महत्त्वाच्या कामासाठी बुलढाणा येथे यावे लागते परंतु बस स्टॉप परिसरातून सदर वाहनधारकांना वाहन चालविण्यास तारेवरची कसरत करीत आपली वाहने गावातून बाहेर काढावी लागतात.या गंभीर बाबीची दखल घेत बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री गजानन कांबळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी श्री गोकुळ सिंग राठोड (P S I) बुलढाणा ग्रामीण देऊळघाट बीट जमादार श्री तायडे, सुधीर मगर आणि वाहतूक पोलीस कर्मचारी यांची मोठ्या संस्थेने उपस्थिती होती.यावेळी विठ्ठल मंदिरापासून एक पाल चौक या भागातून मुख्य बाजारपेठ तसेच आरोग्य सुविधासाठी ये जा करीत असताना या भागात वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई करण्यात आली रस्त्याचे दुतर्फा बेकायदेशीरपणे आपली वाहने उभी करणाऱ्या वर सुद्धा पोलिसांनी कारवाई करून वाहनधारकांना चांगलीच चपराक दिल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे.

Previous Post Next Post