खेर्डा येथील शेतकऱ्यांची अर्ध नग्न आंदोलन तीन जुलै पर्यंत स्थगित...


 
खेर्डा येथील शेतकऱ्यांची अर्ध नग्न आंदोलन तीन जुलै पर्यंत स्थगित...

 जळगाव (जामोद) प्रतिनिधी:-

अतिवृष्टी अनुदानाचे पैसे पाच हजार प्रती हेक्टरी अनुदान, पिक विमा, गत मे महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी ग्राम खेरडा खेरडा बुद्रुक आणि खुर्द येथील शेतकऱ्यांनी यापूर्वी १७ जून रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्यावेळी तहसीलदारांनी लवकरच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. येत्या २४ जुन पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २३ जून पासून तहसील समोर अर्ध नग्न आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. त्यानंतर आंदोलन स्थगित करावे प्रशासकीय स्तरावर कारवाई सुरू आहे असे पत्र तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्यांना दिला होता. अनुसार दीं २४जून रोजी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठले व आमच्या मागण्या लवकर मान्य करा आणि आर्थिक मदतीचे पैसे बँक खात्यात जमा करा अशी विनंती तहसीलदारांना केली. त्यानुसार खेर्डा बुद्रुक आणि खुर्द मधील शेतकऱ्यांनी आपले अर्धनग्न आंदोलन त्वरित स्थगित केले आहे. लवकरच मागण्या मान्य न झाल्यास येत्या ३ जुलै रोजी नियोजित आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिला. शेतकऱ्यांनी तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेतली तेव्हा आमदार डॉ.संजय कुटे, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे हे सुद्धा तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते. आ.डॉ.संजय कुटे यांनी सुद्धा तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांना ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या प्रती सहानुभूती दाखवून अधिकाऱ्यांना त्यावर कारवाई करण्याच्या तात्काळ सूचना दिल्या.यावेळी माजी सभापती प्रवीण भोपळे, वासुदेव राजनकर ,ज्ञानदेव राजनकर ,महादेव वानखडे ,प्रकाश वानखडे, दिलीप वानखडे, निशिकांत देशमुख ,समाधान गिरे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post