सावरगाव येथे उद्‌यानवि‌द्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य पशु लसीकरण...


 
सावरगाव येथे उद्‌यानवि‌द्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य पशु लसीकरण...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलंग्नीत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्‌यानवि‌द्या महावि‌द्यालय जळगाव जामोद येथील  विद्यार्थ्यांनी ग्राम सावरगाव येथे भव्य गुरांचे लसीकरण राबविले पशु वैद्यकीय दवाखाना खांडवी व स्वातंत्र्य वीर गणपतराव इंगळे उद्‌यानविद्या यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण शिबीर २४ जून रोजी ग्राम सावरगाव येथे घेण्यात आले सदर शिबीरात शेतकऱ्यांना घटसर्प, लंपी व इतर ही रोगांन  बद्दल मार्गदर्शन करण्यात आले व तसेच पशु आरोग्य विमा या विषयावरही डॉक्टरानी सखोल असे  मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात आले. या वेळी डॉ एस. पी. निमजे (पशुधन पर्यवेशक, पशुविद्यकीय दवाखाना, खांडवी) व डॉ.एस. एस तळोकार (प.वि.अ) जळगाव जामोद .डॉ वाय. यु. गव्हाळे.व पवन बेलोकार (पशुसेवक) आणि गावाचे संरपंच सौ. मिनाक्षी अजय शेगोकार तसेच या शिबिराच्या यशस्वीतेसाठी इतर शेतकरी राजू शेगोकार, श्यामभाऊ दाभाडे .अमोल दाभाडे व इतर शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.सदर शिबीराला उद्यानविदया महाविद्यालयाचे प्राचार्य श्री योगेश गवई सर महाविद्‌यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा प्रितेश वानखडे सर.आणि विस्तार शिक्षण  विषयाचे विषयतज्ञ जिवेश साळी सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्या करीता विद्यार्थी प्रतिनिधी अथर्व नारखेडे, महेश सैरिसे, प्रज्वल घाटे, राहुल पाटील,पवन क्षिरसागर अंकित घोंगे व वेदांत म्हसाळ यांनी शिबीर यशस्वीरित्या पार पाडले . आणि  तब्बल  या शिबीरात 187 गाई व बैल आणि 91 म्हशी यानां लसीकरण करण्यात आले..

Previous Post Next Post