भोपळे विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव संपन्न...


 
भोपळे विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव संपन्न...

प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती उत्सव, सामाजिक न्याय दिन व पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून हिवरखेड पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे,प्रमुख मार्गदर्शक हिवरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार गजानन राठोड, पीएसआय गोपाल गिलबिले,जागर फाउंडेशनचे तुळशीदास खिरोडकर,जयप्रकाश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य संतोषकुमार राऊत यांनी आजच्या दिनाचा उद्देश प्रतिपादन केले.  तसेच ठाणेदार गजानन राठोड यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मार्गदर्शन केले. यावेळी जागर फाउंडेशनचे तुळशीदास खिरोडकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे सेवन न करण्याबाबत सामूहिक शपथ दिली. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व सामाजिक न्याय दिनविशेष संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या जयंती सोहळ्याचे संचलन प्रा.डॉ.शंकर दुनघव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.श्री.चेतन चुने यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा.डॉ.मयुर लहाने, प्रा.निलेश गिऱ्हे,शारदा घायल मॅडम,प्रतिभा इंगळे मॅडम यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post