नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण धारकांना वेळ देण्यात यावा व अतिक्रमण धारकांबाबत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची शिवसेनेची मागणी...


 
नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण धारकांना वेळ देण्यात यावा व अतिक्रमण धारकांबाबत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची शिवसेनेची मागणी...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

खामगाव नगर परिषदेने नगरपरिषद हद्दीतील सर्व अतिक्रमण काढण्याबाबत आदेश काढला असून त्या आदेशाचा पुनर्विचार करण्यात यावा व अतिक्रमण धारकांना पर्यायी व्यवस्था करून द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना दिनांक 25 जून रोजी राजेंद्र रामदास बघे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यामध्ये दिनांक २७ व २८/०६/२०२५ रोजी नगरपरिषद हद्दीत असलेल्या अतिक्रमित सर्व दुकान हटविण्याचा आदेश काढला असून आपण या गोष्टीचा फेरविचार करून काही महिन्यांचा टाईम द्यावा,व शक्य झाल्यास बाहेर कुठेतरी नगर परिषदे हद्दी मध्ये आपण पर्यायी व्यवस्था करून द्यावी,जेणेकरून छोटे-मोठे व्यवसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही,बुलढाणा, मलकापूर शहरामध्ये रहदारीस अडथळा निर्माण होणार नाहीं असे अतिक्रमण नियमित करण्यात आले असून आपण खामगाव मध्ये रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही असे अतिक्रमण आपल्या नियमाप्रमाणे नियमित करावे.कारण पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून शाळा सुद्धा सध्याच सुरू झालेल्या आहेत,अतिक्रमित असलेले छोट्या मोठ्या व्यवसायिकावर परिवाराबरोबर आपल्या मुलाचे शिक्षणाचे सुद्धा जबाबदारी आहे.कारण ज्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहेत ते व्यक्ती मोलमजुरी करून छोटे मोठे व्यवसाय करून आपला पोटाचा व परिवाराचा उदरनिर्वाह भागवतात आहेत.परंतु आपण घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे. अतिक्रम काढणे हा आपला हक्क आहे आम्ही तो हिराहू शकत नाही आणि आम्हाला तो अधिकार सुद्धा नाही परंतु आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हास काही महिन्याचा टाईम द्यावा कारण आम्ही तोपर्यंत आमच्या उदरनिर्वाहाची पर्याय व्यवस्था करू अशी मागणी अतिक्रमणधारकांच्यावतीने शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित शिवसेना संपर्कप्रमुख सुरेश भाऊ वावगे,शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शिवसेना शहरप्रमुख चेतन भाऊ ठोंबरे,युवासेना शहरप्रमुख राहुल भाऊ कळमकार,शिव बांधकाम कामगार सेना विदर्भ प्रदेश प्रमुख सचिन भाऊ विटे, बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ बोरे,अनुसूचित जाती उपजिल्हाप्रमुख करण भाई बहुनिया,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश भाऊ खरात,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे,महिला आघाडी उप तालुकाप्रमुख ज्योतीताई बुजाडे,वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख धीरज भाऊ कंठाळे,शिवसेना उप तालुका प्रमुख गोपाल भाऊ भिल, किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील वाकुळकर,शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर,युवा सेना शहर संघटक शुभम भाऊ मोरे,सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर,युवा सेना उपजिल्हाप्रमुख निलेश भाऊ देवताडू,शिवसेना उपतालुकाप्रमुख सागर भाऊ मेतकर,शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष भाऊ दुतोंडे,शिवसेना उपतालुकाप्रमुख विष्णुदास कदम,शिवसेना उप तालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे,प्रवीण देशमुख, ज्ञानेश्वर पाटील,योगेश पुरोहित,पृथ्वीराज पिंपळेकर,ओम शंकर देशमुख,बाळू पाटील खडसे,मारोती खोडके,निलेश बुंदेले,योगेश सपकाळ,रोशन जाधव,राहुल रत्नपारखी, विजू सातव,भगवान राऊत,अंबादास गायगोळ, पप्पू पाटील,सेफ खान,नरेंद्र चव्हाण,किशोर चव्हाण,जगण आसेरी,रोशन पोर, गणेश भगत,राहुल राजपूत, दीपक पाटील,आर डी खरतर,एन डी सातव,नितीन खंडारे, सुधाकर माने,अमीर बिरजार राहुल काकडे,हिंदू राष्ट्र सेनेचे रवी भाऊ माळवंदे,रमेश बुदेले,शिवसेना उपतालुकाप्रमुख शिवशंकर भाऊ सरोदे,शिवसेना उप तालुका प्रमुख मंगेश भाऊ काळे,शिवसेना उप तालुका प्रमुख संतोष भाऊ सातव, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रविण पाटील,अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश भाऊ हिवराळे,अनुसूचित जाती शहर प्रमुख मयूर भाई खंडारे,अनुसूचित जमाती तालुकाप्रमुख दीपक भाऊ लठाले,विभाग प्रमुख जीवन भाऊ सोळंकी,विभाग प्रमुख आकाश माने,विभाग प्रमुख लक्ष्मण काकडे,मा.सरपंच जनार्दन मोरे,प्रवीण पोरे, प्रदीप सपकाळ,पियुष तवर, गोविंदा भाऊ सरोदे,नामदेव भाऊ बोंद्रे,अविनाश भाऊ आढाव,विभाग प्रमुख मारुती भाऊ जगताप, विभाग प्रमुख गणेश भाऊ ढगे, दत्ता वांडे,गोपाल चरखे प्रभाकर भाऊ पंजाब टाकस,विकी भाऊ खराडे,यांच्यासह शिवसेना,युवा सेना,महिला आघाडी,किसान सेना,शिव बांधकाम कामगार सेना,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विद्यार्थी सेना,सोशल मीडिया,तसेच शिवसेना,अंगीकृत सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित.

Previous Post Next Post