देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामाच्या धडाका..!१५ व्या वित्त आयोगाच्या निधी विकासाकरिता खर्च होणार..


 
देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामाच्या धडाका..!१५ व्या वित्त आयोगाच्या निधी विकासाकरिता खर्च होणार..

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:- 

बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या मौजे देऊळघाट ग्रामपंचायत चे वृत्तत्वान सरपंच आर आर पसरते यांनी बुलढाणा पंचायत समितीचे माजी सभापती अब्दुल रज्जाक उर्फ बबलू शेठ व माजी उपसरपंच सांडू पाटील यांचे अथक प्रयत्नातून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी ओढून आणून गावातील विकास कामासाठी खर्च करण्याबाबतची कारवाई सुरू केली आहे.त्या निधी अंतर्गत देऊळघाट येथील टिपू सुलतान चौक वार्ड क्रमांक चार इस्माईल किराणा मोमीनपुरा पर्यंत सिमेंट रस्ता, टिपू सुलतान चौक ते जामा मस्जिद पर्यंत सिमेंट रस्ता, जामा मजीद ते कुरेशी मोहल्ला सिमेंट रोड, चांदतारा मोहल्ला ते पूर्ण सय्यद मोहल्ला येथे पेवर ब्लॉक, संत रोहिदास नगर वार्ड क्रमांक दोन मध्ये पेवर ब्लॉक बसविणे धनगर मोहल्ला वार्ड क्रमांक ६. परिसरात पेवर ब्लॉक बसविणे, वार्ड क्रमांक पाच नारायण पाटील यांचे घरापासून पांडुरंग बभराड परिसरात पेवर ब्लॉक बसविणे, यासह इतर परिसरात विविध विकास कामे होणार आहेत.या निधीमधूनच गावातील जिल्हा परिषद हायस्कूल सह प्रायमरी मुले इतर शाळांना डेक्स बेंच व थंड पाण्याचे आरो मशीन आणि विविध शैक्षणिक साहित्य दिल्या जाणार असून शेतकऱ्यांना प्रति एकी एक किलो तूर बियाणाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच देवगड गावाला लवकरच जलजीवन मिशन अंतर्गत मासरूळ येथील पद्मावती धरणावरून पिण्यासाठी पाण्याची पिण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार असल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.या निधी अंतर्गत महिला सबलीकरणासाठी गावातील महिला बचत गटांना सवय रोजगार निर्माण करण्यासाठी  साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेले दिसते आहे.या सर्वोत्तम विकास कामासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच व इतर पदाधिकारी तसेच माजी उपसभापती बबलू शेठ व माजी उपसपंच सांडू पाटील यांची ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात प्रशंसा केल्या जात आहे.

Previous Post Next Post