कर्जमुक्ती अभियानात शेतकऱ्यांनी सामील व्हावे.. ॲड.सतीशचंद्र रोठे.राज्यव्यापी कर्जमुक्ती अभियानाला बुलढाणा जिल्ह्यातून प्रारंभ...


कर्जमुक्ती अभियानात शेतकऱ्यांनी सामील व्हावे.. ॲड.सतीशचंद्र रोठे.राज्यव्यापी कर्जमुक्ती अभियानाला बुलढाणा जिल्ह्यातून प्रारंभ...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

कर्जमाफीची मागणी करणाऱ्यांना कर्जमाफी करावी. मागणी अर्ज नाही त्यांना कर्जमाफीची गरज नाही. या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी कर्जमुक्ती अभियानाला बुलढाणा जिल्ह्यातून प्रारंभ करण्यात आला आहे.यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम कर्जमाफीसाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी अर्ज  सादर करून कर्जमुक्ती अभियानात बहुसंख्येने सामील व्हावे.असे आवाहन किसान ब्रिगेडचे प्रदेश महासचिव ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केले आहे.किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात मागेल त्याला कर्जमुक्ती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. सदर अभियाना अंतर्गत  बुलढाणा स्थित किसान ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयात  जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सभा 4 जूनला सायंकाळी ॲड रोठेंच्या अध्यक्षतेत संपन्न झाली .यावेळी मनोगत व्यक्त करताना ॲड.रोठे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.सदर सभेत कर्जमुक्तीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, तक्रारी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे अर्ज वाटप करण्यात आले. तर शेतकरी कर्जमुक्ती अभियानाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या. यावेळी किसान ब्रिगेड सह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

__

शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.

किसान ब्रिगेडचे प्रदेश महासचिव ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे प्रदेश महासचिव संजय येंडोले,देवेंद्रसिंह सोमवंशी राष्ट्रीय सचिव किसान एकता महासंघ नवी दिल्ली, अल्पसंख्यांक पिछळा वर्गचे शेख सईद शेख कदिर, शेख कदिर, सय्यद युसुफ सय्यद मुसा, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे पाटील, राष्ट्रीय बजरंग दलाचे भूपेश पाटील,सुशांत पाटील,पत्रकार मनोज सनानसे, राजेंद्र ससाणे, प्रधानमंत्री, जन कल्याणकारी परिषद चे गणेश परिहार,पुरुषोत्तम गायकी, महादेव हरमकर,अनिल देवकर, पुरुषोत्तम व्यवहारे पाटील, अनिता राजेंद्र रघुवंशी,सुरेखाताई निकाळजे पंचफुलाबाई गवई, मनोज पाटील, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Previous Post Next Post