सन्मान स्वतंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...


 
सन्मान स्वतंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

दिनांक 8 जून 2025, रोजी आदिती अर्बन बँक हॉल मध्ये मानव समाजातील मानवहितासाठी अहोरात्र झटणाऱ्या समाज सेवकांचा समाज रत्न पुरस्कार तथा सन्मान चिन्ह देऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख सर तथा ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.समाजरत्न पुरस्कार मध्ये  गौरविण्यात आलेल्या मान्यवरामध्ये ओम साई फाऊंडेशन चे अध्यक्ष जीवन रक्षक विलास भाऊ निंबोळकर, निमगाव नांदुरा येथील वृद्धाश्रम संचालक भाऊराव गोविंदराव मूरहे महाराज, रुग्ण सेवक शाळिग्राम पंढरी खंडारे , रुग्ण सेवक सुरेश मारुती लाहुडकर , नुकताच बहुमूल्य लोकमत कर्तुत्वान महिलाचा सन्मान अवॉर्ड 2025 प्राप्त सौ ज्योतीताई सुनील तांदळे, सह परिसरातील समाज सेवकाना समाज रत्न पुरस्कार तथा सन्मान चिन्ह देण्यात आला, यावेळी सन्मान स्वतंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष शेख युनूस सर, महाराष्ट्र प्रदेश मुख्य मार्गदर्शक मधुकर इंगळे महाराज, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष रंजना राठोड, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंदाताई ददगाल,विदर्भ अध्यक्ष डॉ अभिमन्यू वानखडे, विदर्भ महिला अध्यक्ष मंगलाताई गर्दे, विदर्भ महिला उपाध्यक्ष स्नेहल बऱ्हाणपूरे , जिल्हा अध्यक्ष अनंत  गावंडे, नांदुरा तालुका अध्यक्ष कावेरी जाधव, नांदुरा तालुका अध्यक्ष सय्यद नावेद, खामगाव तालुका महिला अध्यक्ष माधुरी तायडे, नांदुरा तालुका अध्यक्ष अनु.... शारदा कव्हळे, नांदुरा तालुका उपाध्यक्ष प्रणिता तायडे, संगीता ताटर , अकोला जिल्हा महिला अध्यक्ष, तथा सन्मान स्वतंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटना चे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते, सदर कार्य सूत्र संचालन मधुकर इंगळे महाराज यांनी तर प्रास्ताविक कावेरी जाधव करून आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची यशस्वी सांगता केली सदर समाज रत्न पुरस्कार यशस्वी करणे करिता संघटनेचे पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post Next Post