आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राच्या कोनशीलेचे केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते अनावरण...


 
आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राच्या कोनशीलेचे केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते अनावरण...

बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी....

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम उत्तम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे . ग्रामीण भागात उद्भवणाऱ्या आजारांवर मुळशी जाण्यासाठी आदर्श ग्रामीण संशोधन केंद्र  मोलाची कामगिरी करेल असा विश्वास केंद्रीय आयुष आरोग्य  कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय आणि एडस संशोधन संस्थेअंतर्गत मेहकर येथे 5.6 कोटी रुपयांचे आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उभारण्यात येणार आहे . या केंद्राचा पायाभरणी समारंभ केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते  आज 23 जून रोजी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे झाला त्यानिमित्य एका कार्यक्रमाचे आयोजन  शेतकरी भवन येथे करण्यात आले या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव माजी आमदार संजय रायमुलकर  शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा बळीराम मापारी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळुकर  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  माधवराव जाधव भागवान  सुलताने पाटील शहर प्रमुख जयचंद भाटिया याच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित या वेळी बोलतांना केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की केंद्र सरकारच्यावतीने विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी राबवल्या जात आहे शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्यसेवा पोहोचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री जे पी जी नड्डा यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशांमध्ये सुरू आहे  प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा ही सुलभ सहज आणि माफक दरात मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे ग्रामीण भागातही संशोधनाचा कार्य व्हावे या दृष्टिकोनातून आदर्श ग्रामीण आरोग्य  संशोधन केंद्राच्या माध्यमातून चांगली   कामगिरी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला केंद्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून पाच लाखापर्यंतचा उपचार करण्याची योजना केंद्र सरकारने आणली आहेत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही आधुनिक तंत्रज्ञान युक्त साहित्य देण्याच काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी आय सीएमआरच्या शस्त्रज्ञ  डॉ शिला गोडबोले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते...

Previous Post Next Post