सय्यद शकिल/अकोला....
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी 35 ते 40 फुट खोल पाणी असलेल्या खदानीत शोध मोहीम राबवून मोठ्या कल्पकतेने धाडसी सर्च ऑपरेशन राबवून शेवटी आज दुपारी पाण्यात बेपत्ता असलेला युवकाचा मृतदेह आज दुपारी शोधून बाहेर काढून दिला.दिनांक 23 जुन 2025 रोजी सकाळी मालेगाव तहसीलदार दिपक पुंडे सर यांनी सकाळी दिलेल्या माहिती वरुन नागरतास ता.मालेगाव जि.वाशिम येथील खदानवर जयकुमार संतोष भुरकाडे महसूल काॅलनी मालेगाव याची खदानवर मोटारसायकल आणी मोबाईल व चप्पल दिसुन आली याच शंकेवरुन जयकुमार हा खदानीत असल्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक पातळीवर शोध मोहीम चालुच होती कुठ बुडाल्याचे स्पाॅट लोकेशन नसल्याने शक्य झाले नाही शेवटी आज शोध मोहीम घेण्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे जिवरक्षक यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले तेव्हाच दिपक सदाफळे यांचेसह टीम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस मॅडम यांच्या आदेशावरून आरडीसी विश्वनाथ घुगे सर यांचे संपर्कात पथक प्रमुख दिपक सदाफळे सहकारी शेखर केवट,अतुल उमाळे,गोपाल गीरे,अपुर्व चेके,अजय डाके,दत्ता मानेकर हे शोध व बचाव साहीत्यासह नागरतास येथे सकाळीच घटनास्थळावर पोहचताच सर्च ऑपरेशन चालु करण्यात आले नेमक कुठे बुडाला हे स्पाॅट लोकेशन माहीती नसल्याने तसेच खदानीत कुठे 35 तर कुठ 40 फुट खोल पाणी आणी कपारी असल्याने शोध मोहीमेस अडथळे निर्माण होत होते तरीपण हे ऑपरेशन मृतदेह मिळेपर्यंत चालुच ठेवणार आहे असे आश्वासन जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी नातेवाईक पोलीस प्रशासनास दिले होते शेवटी अथक प्रयत्नांनंतर आज दुपारी 12:30 वाजताचे दरम्यान 40 फुट तळाशी असलेला मृतदेह शोधुन वर आणुन बाहेर काढला यावेळी घटनास्थळावर मालेगाव तहसीलदार दिपक पुंडे सर रंजना गोरे मॅडम निवासी नायब तहसीलदार,गणेश खुळे मह.सहा.नै.आ.,जय साठे, ग्राम महसूल अधिकारी अमोल भुरकाडे,रामदास डाखोरे,गणेश चौके,शिपाई सुनिल देवळे मह.सेवक बाबाराव शितोळे आणी मालेगाव चे ठाणेदार संजय चौधरी सर,पो.हे.काॅ.सचिन कल्ले साहेब आणी अरुण भुरकाडे,सुनिल भुरकाडे, पोलीस कर्मचारी हजर होते.वाशिम तहसालचे सचिन मोरे सा.म.अ.ऋषीकेश शेळके सं.ऑ.संदीप काळबांडे म.स. यांनी सहकार्य केले तसेच जि.आ.व्य.अ.शाहु भगत साहेब हे सतत संपर्कात होते.अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली आहे.