स्वा.गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तरोडा येथे भेट.ग्रामीण मूल्यांकनासाठी जाणून घेतल्या गावकऱ्यांच्या समस्या...


स्वा.गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तरोडा येथे भेट.ग्रामीण मूल्यांकनासाठी जाणून घेतल्या गावकऱ्यांच्या समस्या...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित स्वातंत्र्य वीर गणपतराव इंगळे कृषी महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिनांक २५ जुन रोजी ग्रामीण कृषीकार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत  तरोडा येथील शेतकरी बांधवांना भेट दिली. महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य गवई सर यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि प्रा. आमले सर, प्रा. अटोले सर आणि प्रा. डव्हळे सर यांच्या देखरेखीखाली ही मोहीम पार पडली.या उपक्रमात विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून गावातील लोकसंख्या, कृषीस्थिती, उपलब्ध संसाधने आणि समस्या समजून घेतल्या.तसेच सहभागी ग्रामीण मुलांकतर्गत गावाची सामाजिक,आर्थिक व शेतीविषयक गोष्टींचा तसेच आरोग्य,पाणी पुरवठा ,वीज पुरवठा,या गोष्टींचा आढावा घेत  गावचे सरपंच बाबुराव पवार,ग्रामपंचायत सदस्य मनोहर झाटे,  शंकर राठोड, संतोष घोंगे,मनोहर ओळदे व ग्रामस्थांशी यांच्या सोबत संवाद साधला,या मूल्यांकन प्रक्रियेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या कार्यात महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋषिकेश कावरे, हेमंत जानुनकर, ऋषिकेश कुलकर्णी, अक्षय कोकरे आणि असल्फ खान यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Previous Post Next Post