पैश्या अभावी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणापासून वंचित...जळगाव जामोद शहरातील खाजगी शिक्षण संस्था चालकांची मनमानी...
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
सध्या मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी व कॉन्व्हेंट संस्कृतीकडे सर्व सामान्य विद्यार्थी व पालकांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे.... आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसूनही अनेक पालक आपल्या पाल्याला जीवघेण्या स्पर्थेत टिकविण्यासाठी अशा महागड्या शाळेत प्रवेश देतात.... भरमसाठ प्रवेश शुल्क आणि शाळेतूनच स्टेशनरी साहित्य विकत घ्यावे लागत असल्याने सर्वसामान्य पालकांची यामुळे मोठी घुसमट होते... परंतु पाल्याच्या शैक्षिणिक भविष्यासाठी कोणताही पालक या भरमसाठ फी बद्दल कोणतीही तक्रार करत नाही.. यामुळेच बहुतांश खाजगी शिक्षण संस्था चालकांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते... बऱ्याचदा शिक्षण संस्थेच्या मनमानीमुळे अनेक विद्याथी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा प्रकार जळगाव जामोद शहरात उघडकीस आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे... जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा कॉन्व्हेंट मध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेने प्रवेश नाकारल्याचे वास्तव समोर आले आहे... सदर विद्यार्थी हा एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे... या विद्यार्थ्याचा काका सागर बळीराम उमरकर यांनी या संदर्भात २१ जून रोजी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे.... सागर उमरकर हे संस्थेचे संचालक डॉ. संदीप वाकेकर यांना या संदर्भात भेटण्यासाठी गेले असता डॉ. वाकेकर यांच्या दवाखान्यातील कर्मचार्यांनी त्यांना जबर मारहाण केल्याची माहितीसुद्धा उमरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे... यावरून जळगाव जामोद शहरातील खाजगी शिक्षण संस्था चालकांची मनमानी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत असून याकडे जळगाव जामोद पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी वामन फंड व प्राथमिक शिक्षणाधिकारी बुलढाणा जिल्हा परिषद यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे...
