जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा...योग अभ्यासातून मिळाली आरोग्यदायी ऊर्जा-ठाणेदार श्रीकांत निचड...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
प्रसेनजित मिश्रा यांनी सर्व उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे योग अभ्यास प्रत्यक्ष करून दाखवले आणि त्यांच्या जीवनात यांचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी सांगितले, "आपण नियमित योग अभ्यास केल्यास केवळ शरीर नव्हे तर मनही संतुलित, निरोगी आणि आनंदी राहते."या उपक्रमात तुळशीराम राठोड हे त्यांचे सहकारी म्हणून सहभागी झाले होते.ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी देखील सक्रिय सहभाग घेत योगाभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "प्राणायाम आणि ध्यान केल्यानंतर मला आतून शांतता आणि सकारात्मकता जाणवली. पोलीस खात्याच्या धकाधकीच्या जीवनात ही ऊर्जा फार आवश्यक आहे."या उपक्रमात ठाणेदार श्रीकांत निचड,पीएसआय नारायण सरकटे,पीएसआय नागेश खाडे,पीएसआय अमोल पंडित,पीएसआय झेडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार,निलेश पुंडे,दिपमाला वानखडे, रामदास घट्टे,सचिन राजपूत, पोलीस नाईक भागवत उबरहंडे,शांतीलाल धिरबस्सी,सुपेश तायडे, मंगेश सोळंके,अर्चना पाचपोर, अयुब शेख, विलास पऱ्हाड,सतिष पटोले, मधुकर गाढे, परमेश्वर ढोण, संदीप रिंढे, स्वप्निल धंदर यांचेसह आरसीबी पथकातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.