जिगाव व अरकचेरी प्रकल्पग्रस्तांना माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते ७ कोटी २२ लक्ष रुपयांचा सानुग्रह निधी वाटप...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद मतदारसंघातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जिगाव तसेच अरकचेरी या प्रकल्पामधील प्रकल्पग्रस्तांना दिनांक २२ जुन रोजी जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते जळगाव जामोद येथील सांस्कृतिक भवन सभागृहात प्रकल्पग्रस्तांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.विदर्भातील सिंचन प्रकल्पाकरीता सन २००६ ते २०१३ दरम्यान ज्या प्रकल्पग्रस्तांनी सरळ खरेदीनी जमिनी दिल्या होत्या, अश्या प्रकल्पग्रस्तांना त्यावेळेस कमी मोबदला दिला होता, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाचे बैठकीमध्ये एकुण १६ हजार हेक्टर करीता प्रति हेक्टर ५ लक्ष याप्रमाणे रु. ८०० कोटी सानुग्रह मोबदला मंजुर करण्यात आला होता. बुलढाणा जिल्हातील जिगांव सिंचन प्रकल्प व अरकचेरी सिंचन प्रकल्पाकरीता सन २००६ ते २०१३ दरम्यान जळगांव जामोद मतदारसंघातील ज्या प्रकल्पग्रस्तांनी सरळ खरेदीने जमिनी घेतल्या अशा प्रकल्पग्रस्तांना आमदार डॉ.संजय कुटे यांचे हस्ते रु. ७ कोटी २२ लक्ष रुपयांची सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे.जळगांव जामोद मतदारसंघातील निमकराड, मांडवा, पळशी घाट पिंपळगांव काळे, भुरखेड सातळी तसेच कुंभारखेड येथील प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान धनादेशाचे वाटप करण्यात आले. सोबतच संग्रामपुर तालुक्यातील अरकचेरी प्रकल्पातील सोनाळा येथील प्रकल्पग्रस्तांना रु. १ कोटी ८५ लक्ष रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. जिगांव प्रकल्पातील मानेगांव व आडोळ बु. ता. जळगावं जा. या बाधित गावठाणातील अतिक्रमीत मालमत्तांना सुध्दा रु. २ कोटी २३ लक्ष रुपयाचे वाटप आमदार डॉ. संजय कुटे यांचे हस्ते करण्यात आले. सोबतच नियामक मंडळाचे मंजुरी नुसार आडोळ खुर्द पुनर्वसीत गावठाणात घर बांधलेल्या प्रकल्पग्रस्तांना पायवा बांधकामाकरीता प्रति कुटुंब १ लक्ष या प्रमाणे अनुदानाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.
सदर अनुदान मिळाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नक्कीच पेरणीच्या काळात याची मदत झालेली असुन त्यांचे चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे.आमदार डॉ. संजय कुटे यांनी मनोगत व्यकत् करतांन सांगीतले की, बुलढाणा जिल्हातील जिगांव हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असुन हा प्रकल्प पुर्णत्वास जात आहे, त्यामुळे या प्रकल्पाकरीता शासन सर्वोतोपरी मदत करीत आहे, तसेच विशेष बाब म्हणुन सदर अनुदान मंजुर केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी सर्व जनतेच्या वतीने आभार मानले. तसेच बाधित गावठाणात घरे गेलेल्या प्रकल्पग्रस्त बांधवानी पुनर्वसीत गावठाणात नविन घरे बांधुन स्थलांतरीत व्हावे अश्या सुचना सुध्दा त्यांनी सदर कार्यक्रमाच्या वेळेस केल्यात.धनादेश वितरण कार्यक्रमाला श्रीराम हजारे अधीक्षक अभियंता जिगांव प्रकल्प पाटबंधारे मंडळ, शेगांव, परमजीतसिंग जुनेजा कार्यकारी अभियंता, जिगांव धरण व पुनर्वसन विभाग, शेगांव, तुषार मेतकर, कार्यकारी अभियंता, जिगांव पुनर्वसन विभाग, खामगांव कार्यकारी अभियंता, प्रविण चावरे कार्यकारी अभियंता जिगांव उपसासिंचन विभाग खामगांव,माजी जि प सदस्य बंडु पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.