अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिर संपन्न...
सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...
अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन अकोट येथील रोटरी नेत्र रुग्णालय येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मोहम्मद बदरुज्जमा हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. थारकर साहेब, श्री शेदानी साहेब, हे होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ता डॉ. विशाल इंगोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित श्री. काशीरामजी साबळे (माजी जिल्हा परिषद सदस्य) सौ. प्रतिभाताई अवचार(पंचायत समिती सभापती) सौ. संध्याताई वाघोळे(माजी जिल्हा परिषद अध्यक्ष) सौ. मंजुषाताई देशमुख(महिला तालुका अध्यक्ष), श्री राजेश भाल तिलक, (अकोट तालुका अध्यक्ष) श्री ज्ञानेश्वर मानकर (जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया) ची प्रमुख उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरूजमा यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व आरोग्य शिबिराचे व रक्तदान शिबिराचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर विविध तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरा मध्ये तपासण्या करण्यात आल्या व रक्तदान करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गरजू रुग्ण उपस्थित होते.