💥देविदास शर्मा इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५ पुरस्काराने सन्मानित...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
महाराष्ट्राचील कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात नावाजलेले हिंदी मराठी दैनिक अहिल्याराज व्दारा वर्धापन दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन एक्सएलन्स अवार्ड 2025 चे आयोजन दिं १ जुन २०२५ रोजी भातृ मंडळ हाॅल मलकापूर येथे कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. खामगाव येथील सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे सेवा कार्य पाहून भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांची निवड करण्यात आली होती सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर रहाणारे शांत. संयमी. नम्र साधे राहणीमान व उच्च विचार. मागील २५ वर्षी पासून श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब गरजुवंतांना थंडी मध्ये ब्लॅकेट वाटप.सामान्य रुग्णालय मध्ये अन्नदान.पक्ष्याकरीता पाणी पात्र निशुल्क वाटप.वृक्षारोपण.सामाजिक जनजागृती.असे अनेक उपक्रम पारदर्शकपणे सर्वाना सोबत घेऊन कार्य करणारे त्यांच्या या कार्याची दखल घेत देविदास शर्मा यांचा सत्कार स्मृती चिन्ह. प्रमाण पत्र. व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी इंडियन एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजुभाऊ काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती.कार्यक्रमाचे उद्घाटक धनश्री ताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ. प्रमुख अतिथी निलेश तायडे सहा माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई, मलकापूर चे ठाणेदार संदीप काळे.भाई अशांत वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ, प्रसाद जाधव राष्ट्रवादी जिल्हा ऊपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक,प्रा, डॉ अनिल खर्चे.फारुख शेख ज्येष्ठ पत्रकार लोकमत, दामोदर शर्मा शेतकरी नेते, वीरसिंहदादा राजपूत ज्येष्ठ पत्रकार होते. याप्रसंगी किशोर लोंढे व परिवाराच्या वतीने सुध्दा देविदास शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे दिलीप झापर्डे. अरूण कडवकर.किशोर लोंढे. लालाजी सांगळे चंदा लोंढे.पुष्पा भागडे.उपस्थित होते