सहकार विद्या मंदिर,जळगाव जामोद येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा...
जळगाव जामोद प्रतिनिधी –
"One Earth, One Health" –
एक पृथ्वी, एक आरोग्य..
योग म्हणजे आरोग्याचा मंत्र,
शांततेचा आणि शक्तीचा केंद्र।
प्राणायामाने मिळेल सुखाचा संग,
स्वतःची नाती जोडण्याचा रंग।
सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. "One Earth, One Health" या घोषवाक्याला अनुसरून, संपूर्ण कार्यक्रम आरोग्य, शांती आणि समतोल जीवनशैलीचे महत्व अधोरेखित करणारा ठरला.या कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे अध्यक्ष मा. डॉ. किशोर केला सर तसेच मुख्य संयोजिका डॉ. (सौ.) स्वाती केला मॅडम यांच्या प्रेरणेतून झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्रथमेश अशोक व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “आज मी जे काही आहे, ते या शाळेमुळेच शक्य झाले. शाळेतील शिक्षण व संस्कार आयुष्यात उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधींचा पुरेपूर उपयोग करावा.”प्रसिद्ध योग प्रशिक्षक प्रसन्नजीत मिश्रा यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील फायदे, विविध आसने व प्राणायाम याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर करत उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. सर्व कार्यक्रम शिस्तबद्धतेने पार पडला. उपस्थित मान्यवरांनी योगाचा नियमित सराव करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात प्राचार्य विनायक उमाळे सर, विनोद ईश्वरे सर, पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे मॅडम, मनीषा म्हसाळ मॅडम, क्रीडा शिक्षक योगेश घुटे सर आणि सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोडडे मॅडम, प्रास्ताविक राऊत मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सुलताने मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.