आंतरराष्ट्रीय योग दिवस जळगाव जामोद नगरपरिषदेच्या वतीने साजरा...


 
आंतरराष्ट्रीय योग दिवस जळगाव जामोद नगरपरिषदेच्या वतीने साजरा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

आंतरराष्ट्रीय योग दिन नगरपरिषद जळगाव जामोद यांच्यामार्फत मोठ्या उत्साहात साजरा केला योगा फोर वन अर्थ वन हेल्थ एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग स्थानिक नगर परिषद जळगाव जामोद कार्यालयामार्फत सांस्कृतिक भवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉ. अपर्णाताई कुटे,तहसीलदार पवन पाटील,नगरपरिषद जळगाव जामोद मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव ,भाजपा जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, माजी नगरसेवक निलेश शर्मा,भाजपा शहराध्यक्ष कैलास पाटील, बाळू चव्हाण, छाजेड साहेब, हिस्सल,परम राजपूत यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक योग गुरु  पुष्पा कसूरकार मॅडम व प्रजापती ब्रह्मकुमारी शशी दीदी ह्या होत्या.कार्यक्रमाची  सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली.त्यानंतर सर्वांनी व्यसनमुक्ती व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली त्यानंतर योग गुरु पुष्पा कसूरकार व अनुराधा बारहाते यांनी आसने व प्राणायाम घेतले व त्याचे महत्त्व समजून सांगितले त्यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी शशी दीदी यांनी ध्यान व साधनेचे बाबत मार्गदर्शन केले त्यानंतर महिला योगा ग्रुपने सर्वांना विविध औषधीयुक्त आरोग्यदायी रस वाटप केला सदर कार्यक्रमाला शहरातील विविध संघटनांनी सहभाग नोंदवला यामध्ये व्यापारी संघटना, मॉर्निंग क्रिकेट क्लब कौस्तुभ नगर ,महिला योगा ग्रुप ,डॉक्टर असोसिएशन ,आर्ट ऑफ लिविंग , प्रजापिता ब्रह्मकुमारी संघटना ओम शांती राजकीय पक्षाचे पदाधिकारी न. प. सर्व शिक्षक  कर्मचारी उपविभागीय कार्यालयाचे कर्मचारी ,तहसील कार्यालयाचे कर्मचारी, पंचायत समिती कार्यालयाचे कर्मचारी, नगरपरिषद सर्व कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी ,महिला बचत गट सीआरपी, शाळेचे विद्यार्थी, शहरातील पत्रकार ,शहरातील  प्रतिष्ठित नागरिकांनी नोंदवला मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व मोठ्या उत्साहात कार्यक्रम यशस्वी पार पडला..

Previous Post Next Post