नगर परिषद प्रभाग रचना पारदर्शकतेने करा- राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्यधिकारी यांना निवेदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
दिनांक 27 जुन 2025 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल तथा शहराध्यक्ष ईरफान खान यांच्या नेतृत्वात आगामी नगर परिषद निवडणुक प्रभाग रचना पारदर्शकरित्या होने बाबत मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सध्या नगर परिषद प्रभाग रचना सुरु असुन सदर प्रभाग रचना शासनाने दिलेल्या निकषाप्रमाणे रचना करण्यात यावी. तसेच सत्ताधार्याच्या दबावाला व आमिशाला बळी न पडता पारदर्शकतेने सर्व गोष्टी करण्यात याव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे ईशारा देण्यात आला. यावेळी प्रसेनजीत पाटिल, विश्वासराव भालेराव,प्रमोद सपकाळ,एम.डी. साबीर, ईरफ़ान खान, शेख जावेद, संजय ढगे,अधि. मोहसिन खान, सिद्धार्थ हेलोड़े, वासुदेव दंडे, एजाज देशमुख, भास्कर येऊल,अजहर पटेल,आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, संदीप ढगे,शशिकांत मिसाळ,गजानन वानखड़े, फिरोज खान यांच्यासह शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
