भाऊसाहेब बी. एस. पटेल गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
पिंपळगाव काळे येथे दिनांक १५ जून २०२५ रोजी बापुमिया सिराजोद्दीन पटेल शैक्षणिक संकुलामध्ये भाऊसाहेब उपाख्य बी. एस. पटेल गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला, याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य एम. बी. इंगळे यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.भाऊसाहेब बी. एस. पटेल गुरुजी या परिसरातील शिक्षणाचे एक प्रेरणा स्त्रोत होते त्यांच्या प्रेरणेमुळेच या परिसरामध्ये के. जी. ते पी. जी. पर्यंत शिक्षणाची गंगा निर्माण झाली. व परिसरातील गोरगरीब जनतेच्या मुला मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था झाली. त्यांचे स्वप्न होते की, ग्रामीण भागातील आदिवासी, गरीब विद्यार्थी घरच्या भाकरी खाऊन उच्च शिक्षित झाले पाहिजे. आज त्यांचे स्वप्न साकार होताना दिसत आहे . गुरुजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बी. एस. पटेल संकुलातील सर्व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी प्रयत्नशील आहेत .सदरील कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ. फराह शेख, शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.