विद्यार्थ्यांसाठी बस सेवा तात्काळ सुरू करा वंचित ची मागणी....


विद्यार्थ्यांसाठी बस सेवा तात्काळ सुरू करा वंचित ची मागणी....

 जळगाव जामोद प्रतिनिधी...

दिनांक 30 6 2025 रोज सोमवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या आदेशानुसार तसेच तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई सर यांच्या नेतृत्वात माननीय आगार प्रमुख जळगाव जामोद यांना विद्यार्थ्यांसाठी सुरळीत बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. विद्यार्थी या भारत देशाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे अशातच शिक्षण घेत असताना जर विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी बस सुविधा त्यांच्या वेळेनुसार नसेल तर तो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. ही अवस्था विद्यार्थ्यांवर येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडी ,युवा आघाडी, शहर आघाडी ,आणि महिला आघाडी तसेच भारतीय बौद्ध महासभा मैदानात उतरलेली आहे. जळगाव जामोद मधील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बस सेवा समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे . अगदी आक्रमक भूमिका पक्षाने घेतलेली आहे.तालुका अध्यक्ष रमेश नाईक हे काही दवाखान्याच्या कारणामुळे मुंबई येथे गेलेले आहेत परंतु तरीही आपल्या पक्षाचे कामकाज न थांबता ते सुरू राहिलं पाहिजे कार्यकर्त्यांची कार्य अविरत चालू राहण्यासाठी तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई सर यांना त्यांनी कार्य करण्यासाठी पदभार दिलेला आहे. यावरून तालुका अध्यक्ष रमेश नाईक हे एक कर्तव्यदक्ष तालुकाध्यक्ष आहेत हे नाकारता येत नाही. म्हणून तालुकाध्यक्ष रमेश नाईक यांच्या आदेशानुसार हे निवेदन देण्यात आलेले आहे.वंचित बहुजन आघाडीच्या या मागणीचा विचार न झाल्यास वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाव जामोद ही पूर्ण ताकतीनिशी तीव्र आंदोलन करेल.असे तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई सर यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीने विद्यार्थ्यांच्या साठी म्हणजे शैक्षणिक फी संदर्भात आणि विद्यार्थ्यांच्या बस संदर्भात महत्त्वाची पावले उचललेली आहे याची सर्व तालुका स्तरावर कौतुकास्पद चर्चा होत आहे.निवेदन देतेवेळी तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई सर, ज्येष्ठ नेते साहेबराव भगत जिल्हा सदस्य स्वप्निल गवई, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर युवा तालुकाध्यक्ष राजरत्न वाकोडे शहराध्यक्ष आझम कुरेशी, युवा शहराध्यक्ष प्रवीण तायडे, तालुका उपाध्यक्ष राजेश तायडे दिलीप तायडे, मीडिया प्रमुख रवींद्र जाधव तालुका महिला अध्यक्ष सुनीता ताई हेलोडे, युवा नेतृत्व अमोल तायडे, मिलिंद डोंगरदिवे भास्कर जुंबळे ईश्वर दाभाडे संजय वाकोडे सुखदेव निंबाळकर संतोष पाटोळे गौरव वतपाळ आणि विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. यामध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी शहरा आघाडी महिला आघाडी ,भारतीय  बौद्ध महासभा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post