महिला बचत गटांसाठी शेतीशाळेचे आयोजन – कृषी तंत्रज्ञान व बीजप्रक्रियेवर मार्गदर्शन...


 
महिला बचत गटांसाठी शेतीशाळेचे आयोजन – कृषी तंत्रज्ञान व बीजप्रक्रियेवर मार्गदर्शन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत पळशी सुपो येथे महिलांच्या शेती शाळे चे कृषी विभागामार्फत आयोजन कृषी विभागाच्या वतीने गावातील महिला बचत गटांसाठी विशेष शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश महिलांना आधुनिक शेतीतंत्रज्ञानाची माहिती देणे, व त्यांच्या सशक्तीकरणात योगदान देणे हा होता.या शेतीशाळेत उप कृषी सहायक श्रीकृष्ण शिंदे यांनी उपस्थित महिलांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी खरीप हंगामासाठी योग्य पीक निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग आणि किड नियंत्रण याविषयी सविस्तर माहिती दिली.विशेषतः बीजप्रक्रियेच्या महत्त्वावर भर देत, शिंदे सरांनी महिलांना बियाण्यांची प्रक्रिया कशी करावी, कोणते उपचार करावेत, आणि कोणत्या प्रमाणात व कशा पद्धतीने वापरावे याचे प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन दिले.बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाणे किडींपासून व रोगांपासून सुरक्षित राहतात आणि उगमशक्ती वाढते, असे सांगत त्यांनी थायरम, ट्रायकोडर्मा व कार्बेन्डाझीम सारख्या प्रक्रिया औषधांची माहिती दिली आणि बीजप्रक्रिया करून दाखविली.महिलांनी शेतीशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, प्रश्न विचारले आणि आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली. शेती विषयांतील तांत्रिक गोष्टींना त्यांनी सहजपणे समजून घेतले. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्‌यापीठातंर्गत स्थानिय एस.व्ही.जी.आय कृषी महावि‌द्याव्यातील अंतीम वर्षीय ( Rawe) विद्यार्थ्यांनी गावातील बचत गट महिलांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा (RAWE) उद्देश ग्रामीण जीवनाशी प्रत्यक्ष अनुभूती घेणे आणि महिलांच्या स्वावलंबी प्रवासातून शिकणे हा होता. महिलांनी त्यांचे शेतीपूरक व्यवसाय, बचत गटांच्या माध्यमातून झालेला आर्थिक बदल, आणि सामाजिक सशक्तीकरणाचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगीतले. बचत गटामूळे केवळ पैसे वाचवले नाहीत तर आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि एकत्र काम करण्याची सवयही लावली, असे बचत गट अध्यक्षांनी सांगितले या कार्यक्रमात उपसहायक कृषीअधिकारी श्रीकृष्ण शिंदे सर, सहायक कृषी अधिकारी गवळी मॅडम, आणि बचत गट अध्यक्ष ज्योती गजानन कोकाटे , मुक्ता रविन्द्र देवकर आणि RAWE ग्रुप चे सदस्य हर्ष भगत, अजय भगत, यश घुगे, मयुर तांदळे, विशाल देशमुख हे विद्यार्थी उपस्थीत होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य. योगेश गवई, कार्यक्रम अधिकारी अविनाश आटोळे, प्रमोद डव्हळे, विषय तज्ञ श्रीकृष्ण आमले यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous Post Next Post